-
होंडा मोटरसायकल अँड स्कुटर इंडियाने भारतातील आपली सर्वात लोकप्रिय बाइक Unicorn आता अपडेटेड BS6 इंजिनमध्ये लाँच केलीये. यासोबतच बाइकच्या किंमतीतही बदल झालाय. (सर्व छायाचित्र सौजन्य – होंडा टूव्हिलर्स इंडिया)
नवीन बाइक अधिक प्रिमियम डिझाइन आणि दमदार इंजिनसह लाँच करण्यात आलीये. याशिवाय बाइकच्या स्टाइलमध्ये थोडाफार बदल केलाय. कंपनीने नव्या बाइकमध्ये 'इंजिन किल स्विच' दिले आहे. ग्राहकांना हे फीचर आवडेल अशी कंपनीला अपेक्षा आहे. -
नव्या युनिकॉर्नमध्ये आता क्रोम गार्निश फिनिशिंगसह स्मोक्ड स्क्रीन फ्रंट काउल दिला आहे. बाइकमध्ये 3D लोगो आणि अनेक ठिकाणी क्रोम वर्क करण्यात आलंय.
-
ब्लू बॅकलिट सेमी-डिजिटल इंस्ट्रुमेंट कंन्सोल या बाइकमध्ये असून टेललाइटची डिझाइन आधीप्रमाणेच ठेवण्यात आली आहे. आरामदायक प्रवासासाठी ग्राउंड क्लिअरंस वाढवण्यात आलाय.
-
बाइकमध्ये नवीन एचईटी लो-रोलिंग रेसिस्टंस ट्युबलेस टायर्स दिलेत. तर, पुढील टेलिस्कोपिक फोर्क्स आणि मागील मोनोशॉक सस्पेंशन आधीप्रमाणेच आहेत.
होंडाने ही बाइक केवळ 160cc इंजिन या एकाच व्हर्जनमध्येच लाँच केली आहे. त्यामुळे कंपनीकडून आता 150cc व्हर्जनच्या Unicorn ची विक्री होणार नाही, असा थेट अर्थ काढला जातोय. शिवाय यापूर्वीच कंपनीने CB Unicorn 160 ची विक्रीही बंद केलीये. त्यामुळे यापुढे Unicorn 160 BS6 हे एकच व्हर्जन विक्रीसाठी उपलब्ध असण्याची शक्यता आहे. -
कंपनीच्या इतर BS6 बाइक्सप्रमाणे नव्या युनिकॉर्नवरही 6 वर्षांची वॉरंटी मिळेल. पर्ल इग्नस ब्लॅक, इंम्पेरिअल रेड मेटॅलिक आणि मॅट अॅक्सिस ग्रे मेटॅलिक या तीन रंगांमध्ये ही बाइक लाँच करण्यात आली आहे.
-
यासोबतच बाइकच्या किंमतीतही बदल झालाय. नव्या Unicorn 160 BS6 ची किंमत आधीच्या मॉडेलच्या तुलनेत जवळपास 13 हजार 500 रुपयांनी अधिक आहे.
-
नव्या Unicorn 160 BS6 ची एक्सशोरूम किंमत 93 हजार 593 रुपये ठेवण्यात आली आहे.
-
याशिवाय काही दिवसांपूर्वीच कंपनीने आपली सर्वाधिक विक्री होणाऱ्या 125cc बाइकपैकी एक Honda Shine ही बाइकही अपडेटेड BS6 इंजिनसह लाँच केली आहे. नव्या होंडा शाइनमध्ये नवीन 5 स्पीड ट्रान्समिशन आणि फ्युअल-इंजेक्टेड इंजिन देण्यात असून ड्रम आणि डिस्क अशा दोन व्हेरिअंट्समध्ये ही बाइक उपलब्ध असेल.
-
बाइकमध्ये 5 स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स असून ग्राउंड क्लीअरंस आणि व्हिलबेस अनुक्रमे 5mm आणि 19mm वाढवण्यात आला आहे. याशिवाय बाइकमध्ये नवीन DC हेडलँप, इंटीग्रेटेड हेडलँप बीम आणि पासिंग स्विच आहे.
-
बाइकच्या सीटची लांबी 27mm असून बाइकमध्ये 5 स्टेप अॅड्जस्टेबल रिअर सस्पेंशन आणि कॉम्बी ब्रेक सिस्टम (CBS) आहे.
इंजिन – बाइकमधील नवीन फ्युअल इंजेक्टेड 125cc इंजिन, जुन्या Honda CB Shine पेक्षा अधिक ऊर्जा आणि टॉर्क निर्माण करते. नवीन इंजिन 7500 rpm वर 10.72 bhp ची ऊर्जा आणि 6,000 rpm वर 10.9Nm पीक टॉर्क निर्माण करतं. याशिवाय नव्या इंजिनमध्ये सायलेंट स्टार्टरसोबत एनहान्स्ड स्मार्ट पावर (eSP) देण्यात आले आहे. बाइकच्या मागे लो-रेजिस्टन्स ट्युबलेस टायर आहेत , हे टायर ऑप्टिमम ग्रिप कायम ठेवतात आणि एनर्जी लॉस कमी होतो. नव्या इंजिनमुळे बाइकची इंधन कार्यक्षमता 14 टक्क्यांनी वाढलीये, त्यामुळे नवीन शाइन जुन्या गाडीच्या तुलनेत अधिक दमदार मायलेज देईल असा कंपनीचा दावा आहे. किंमत – Unicorn 160 BS6 ची एक्सशोरूम किंमत 93 हजार 593 रुपये आहे. तर, BS6 Honda Shine ची एक्स-शोरूम किंमत 67 हजार 857 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे.
