आली ‘हीरो’ची Super बाइक, आधीपेक्षा जास्त पावरफुल-ग्राउंड क्लिअरंसही वाढला
- 1 / 15
हीरो मोटोकॉर्पने आपली भारतातील सर्वाधिक पॉप्युलर बाइक Hero Super Splendor बीएस-6 इंजिनसह लाँच केली आहे. यासोबतच बाइकच्या किंमतीतही बदल झालाय. (सर्वछ छायाचित्र सौजन्य -heromotocorp.com )
- 2 / 15
ही बाइक सेल्फ ड्रम अॅलॉय व्हिल आणि सेल्फ डिस्क अॅलॉय व्हिल अशा दोन व्हेरिअंट्समध्ये उपलब्ध असेल.
- 3 / 15
नवीन सुपर स्प्लेंडरमध्ये XSens टेक्नॉलॉजी असलेले 125cc PFI (प्रोग्राम्ड फ्युअल इंजेक्शन) इंजिन आहे.
- 4 / 15
हीरो i3S टेक्नॉलॉजी असलेले या बाइकचे इंजिन आवश्यकता नसताना आपोआप स्विच ऑफ होते आणि केवळ क्लच प्रेस केल्यानंतर इंजिन पुन्हा सुरू होते.
- 5 / 15
नव्या सुपर स्प्लेंडरमधील बीएस-६ इंजिन आता 10.73bhp पावर आणि 10.6Nm टॉर्क निर्माण करते. हीरोच्या या बाइकमध्ये 5 स्पीड गिअरबॉक्स दिले आहेत.
- 6 / 15
नव्या हीरो सुपर स्प्लेंडरमध्ये ग्राउंड क्लियअंस 30mm वाढवण्यात आला आहे.
- 7 / 15
याशिवाय, आरामदायी प्रवासासाठी आधीपेक्षा 45mm जास्त लांब सीट देण्यात आलं आहे.
- 8 / 15
बाइकमध्ये 240mm फ्रंट डिस्क ब्रेक आहेत. तसेच, 130mm रिअर ड्रम ब्रेक CBS (कंबाइंड ब्रेकिंग सिस्टिम) आहे.
- 9 / 15
बाइकला आधीपेक्षा जास्त रिफ्रेशिंग लूक देण्यात आला असून ड्युइल पेंट स्कीमचा वापर करण्यात आला आहे.
- 10 / 15
ही बाइक नवीन मेटेलिक नेक्सस ब्लू शेडमध्ये उपलब्ध असेल. याशिवाय कँडी ब्लेजिंग रेड, ग्लेज ब्लॅक आणि हेवी ग्रे कलर अशा तीन अन्य रंगांचे पर्यायही आहेत.
- 11 / 15
कंपनीने काही दिवसांपूर्वीच आपल्या Xtreme 160R, Passion Pro आणि Glamour या तीन बाइक BS6 इंजिनमध्ये लाँच केल्या आहेत.
- 12 / 15
कंपनीने आता आपल्या सर्व BS4 मॉडेल्सचं प्रोडक्शन बंद केलंय.
- 13 / 15
- 14 / 15
किंमत - सेल्फ ड्रम अॅलॉय व्हिल व्हेरिअंटची किंमत 67 हजार 300 रुपये आणि सेल्फ डिस्क अॅलॉय व्हिल व्हेरिअंटची किंमत 70 हजार 800 रुपये ठेवण्यात आली असून या दोन्ही एक्स-शोरुम किंमती आहेत.
- 15 / 15
नव्या बाइकची खासियत म्हणजे, हीरो i3S टेक्नॉलॉजी असलेले या बाइकचे इंजिन आवश्यकता नसताना आपोआप स्विच ऑफ होते आणि केवळ क्लच प्रेस केल्यानंतर इंजिन पुन्हा सुरू होते.