मी गाढव आहे, मॉर्निंग वॉकला निघालेल्या नागकरिकांचा पोलिसांकडून पाणउतारा
- 1 / 11
पिंपरी चिंचवड मॉर्निंग वॉकला गेलेल्या नागरिकांच्या हाती मी गाढव आहे मला सांगितलेले कळत नाहीचे फलक
- 2 / 11
पिंपरी-चिंचवड शहरातील उच्चभ्रू वसाहत म्हणून निगडी प्राधिकरणकडे पाहिले जाते. परंतु, तेच नागरिक मात्र नियमांची पायमल्ली करत असल्याच दिसत आहे.
- 3 / 11
करोनाच्या पार्श्वभूमीवर अवघा देश बंद आहे. संचारबंदी असल्याने बाहेर निघण्यास नागरिकांना मज्जाव आहे.
- 4 / 11
असं असताना देखील काही उच्चशिक्षित नागरिक मॉर्निंग वॉकला बाहेर पडले होते.
- 5 / 11
निगडी पोलिसांनी त्यांना पकडून यांच्यावर कारवाई करत 'मी गाढव आहे मला सांगितलेले कळत नाही' असे मजकूर असलेले फलक हातात देऊन वेगळी शिक्षा दिली.
- 6 / 11
मार्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या दहा नागरिकांवर निगडी पोलिसांनी कारवाई केली
- 7 / 11
त्यांच्यावर १८८ नुसार कारवाई करण्यात आली आहे. यातील काही जनांनी मास्क देखील घातले नव्हते.
- 8 / 11
काहीजण तर कुत्रे फिरवण्यासाठी बाहेर पडले होते.
- 9 / 11
पोलिसांनी संबंधित व्यक्तींच्या हाती काही मजकूर असलेले फलक देण्यात आले होते.
- 10 / 11
'मी गाढव आहे मला सांगितलेले कळत नाही'......'मी आदेश पाळत नाही कारण मी उच्च शिक्षित दीड शहाणा आहे'....असे केल्याने उच्चशिक्षित व्यक्ती बाहेर पडणार नाहीत अशी आशा पोलिसांना आहे.
- 11 / 11
ही कारवाई निगडी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी सोनवणे यांनी केली आहे.