गोंधळून जाऊ नका हा चंद्र नाही ही तर नवी मुंबई…
- 1 / 5
नवी मुंबई : महापे एमआयडीसी परिसरात खड्डे, रस्त्यांची दुरावस्था आणि त्यात साचलेलं पावसाचं पाणी यामुळे अपघाताच्या अनेक घटना घडल्या आहेत. (सर्व छायाचित्रं - नरेंद्र वासकर)
- 2 / 5
पावसामुळे रस्ता पूर्णतः उखडून गेला असून तो अपघाताला निमंत्रण देत आहे.
- 3 / 5
रस्ते उखडले गेल्यामुळे त्याखालील केबल्सही बाहेर आल्या असून त्यामुळे वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे.
- 4 / 5
या उखडलेल्या रस्त्यांवरुन ओढ्याप्रमाणे पाणी वाहत असल्याने रस्ते आणखीनच खराब होत आहेत. त्यामुळे त्याची तातडीने दुरुस्ती करणे आवश्यक आहे.
- 5 / 5
रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून दगडही वर आले आहेत. त्यामुळे गंभीर अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.