एकेकाळी भीक मागणारा मुलगा आज आहे ५० कोटींचा मालक
- 1 / 20
मेहनतीला जिद्द आणि चिकाटीची जोड असल्यास यश मिळतेच. तसेच मेहनतीला नशीबाची साथ असल्यास यश पायात लोळण घालतं. लहानपणी भिक्षा मागून पोट भरणाऱ्या एका व्यक्ती आज कोट्यवधीचा मालक आहे. बंगळुरूमधील रेणुका आराध्य आज ५० कोटींपेक्षा जास्तचे मालक आहेत.
- 2 / 20
लहानपणी भिक्षा मागून पोट भरणारे रेणुका आराध्य आज प्रवासी कॅब प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे मालक आहेत... आजच्या सक्सेस स्टोरीमध्ये आपण रेणुका आराध्य यांचा यशाची कहानी पाहणार आहोत...
- 3 / 20
रेणुका आराध्य यांचा जन्म बंगळुरु येथील एनेकाल तालुक्यातील गोपासंद्र गावात झाला. त्यांचे वडील एका मंदिराचे पुजारी होते.
- 4 / 20
रेणुका आराध्य यांच्या वडिलांना कोणतंही आर्थिक मानधन दिलं जात नव्हतं. आपल्या कुटुंबाचा सांभाळ करण्यासाठी ते आसपासच्या गावात भिक्षा मागावी लागत असे, त्यांच्या या कामात रेणुकानेही साथ दिली.
- 5 / 20
भिक्षेमध्ये लोकांनी दिलेल्या अन्नधान्यावर त्यांचे कुटुंब जगत होते. घरची हालाखीची परिस्थिती असल्याने रेणुका यांना शिक्षण अर्धवट सोडावं लागलं.
- 6 / 20
त्यानंतर त्याच्या वडिलांना रेणुकाला एका वृद्ध व्यक्तीची सेवा करण्याचं काम दिलं. जवळपास एक वर्ष हे काम सुरु होतं. त्यानंतर रेणुकाला एका आश्रमात टाकण्यात आले.
- 7 / 20
ज्याठिकाणी त्याला दिवसातून दोनदा जेवण दिलं जात असे, सकाळी ८ ते रात्री ८ दरम्यान त्यांना जेवण मिळत असे, पण याच आश्रमात त्यांच्या डोक्यात काहीतरी करण्याची जिद्द निर्माण झाली.
- 8 / 20
दहावीत शिकत असताना वडिलांचे निधन झाले त्यानंतर कुटुंबाची जबाबदारी रेणुकावर आली. यावेळी त्यांनी शिक्षण सोडून विविध कंपन्यांमध्ये नोकरी करण्यास सुरुवात केली.
- 9 / 20
तीन वर्ष विविध कंपन्यात काम करत असताना त्यांच्या डोक्यात काहीतरी सुरु करण्याचा विचार घोंगावत होता. अशातच त्यांनी सुटकेस, वॅनिटी बॅग बनवण्याचा उद्योग सुरु केला. मात्र काही काळानंतर हा उद्योग बंद पडला.
- 10 / 20
रेणुका आराध्य यांचे गुंतवणूक केलेले सर्व पैसे बुडाले. घरची जबाबदारी आणि आर्थिक परिस्थिती लक्षात घेता त्यांनी ड्रायव्हर बनण्याचं निश्चित केले.
- 11 / 20
लग्नाची अंगठी विकून त्यांनी वाहन शिकवण्याचं प्रशिक्षण घेतले. त्यानंतर एके ठिकाणी नोकरी करत त्यांनी मृतदेह वाहतूक करण्याचं काम सुरु केले.
- 12 / 20
निष्ठा, जिद्द आणि त्यांचा प्रमाणिकपणा या जोरावर ग्राहकांसोबत संबंध चांगले झाले. काही पैसे जमवल्यानंतर त्यांनी २००१ मध्ये सिटी सफारी म्हणून कंपनीची सुरुवात केली.
- 13 / 20
बँक लोन घेऊन त्यांनी इंडिका गाडी खरेदी केली, त्यानंतर दीड वर्षाच्या काळात दुसरी गाडी खरेदी केली. हळूहळू गाड्यांच्या संख्येत वाढ झाली. त्यानंतर इंडियन सिटी टॅक्सी नावाची कंपनी विकत आहे अशी माहिती मिळाली.
- 14 / 20
ही संधी न सोडता रेणुकाने सर्व गाड्या विकून, मार्केटमधून उधारी घेऊन ही कंपनी खरेदी करण्याची जोखीम पत्करली. यानंतर त्यांनी आपल्या आयुष्यात कधीच मागे वळून पाहिलं नाही.त्यांची प्रवासी कॅब प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नावारुपाला आली.
- 15 / 20
एकेकाळी ४ गाड्या असताना आज त्याची संख्या ३०० झाली आहे. बंगळुरुनंतर चेन्नई येथे त्यांनी आपली शाखा उघडली आहे.
- 16 / 20
अॅमेझोन, गुगल, वॉलमार्ट, जनरल मोटर्ससारख्या बड्या कंपन्या त्यांच्या ग्राहक आहेत.
- 17 / 20
ग्राहकांशी चांगले संबंध आणि विश्वास कमावल्यामुळे ओला, उबेरसारख्या कंपन्यांनाही आजतागायत त्यांनी मागे ठेवले आहे.
- 18 / 20
रेणुका आराध्य यांच्या कंपनीत १ हजारपेक्षा जास्त लोक काम करतात.
- 19 / 20
रेणुकाच्या कंपनीचा वर्षाला ४०-५० कोटींची आर्थिक उलाढाल होते.
- 20 / 20
फोटो सौजन्य - Pravasi Cabs Pvt Ltd आणि Renuka Aradhya यांच्या फेसबुक पेजवरून घेतले आहेत.