लाखांचा पोशिंदा जेव्हा क्षणभर विसावतो…
- 1 / 6
भारत हा कृषीप्रधान देश आहे. करोनासारखी महामारी असो किंवा कोणतीही नैसर्गिक आपत्ती...या देशातील शेतकऱ्याने नेहमी संकटावर मात करुन शेतीत अन्नधान्य पिकवण्याचं काम केलं आहे. सध्या करोनामुळे संपूर्ण देशभरात लॉकडाउनचा खेळ सुरु आहे. पण देशाचं पोट भरण्याची जबाबदारी असलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या कामाला सुरुवात केली आहे.
- 2 / 6
पुण्यातील पाबे गावाजवळ भातशेतीची कामं सुरु झाली आहेत. या कामांमधून वेळ मिळाल्यानंतर शेतकरी वर्ग शेतातच बसून जेवायला सुरुवात करतो. (सर्व छायाचित्र - पवन खेंगरे)
- 3 / 6
करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती आणि लॉकडाउनचा या शेतकऱ्यांनाही चांगलाच फटका बसला. पण देशातील प्रत्येक नागरिकाच्या ताटात रोज अन्नाचा कण दिसायचा असेल तर थांबून चालणार नाही हे या शेतकऱ्यांना माहिती आहे.
- 4 / 6
जमेलं तसं सोशल डिस्टन्सिंग आणि स्वतःची काळजी घेत हे शेतकरी आणि मजूर दोन घास पोटात ढकलतात आणि पुन्हा एकदा कामाला लागतात.
- 5 / 6
पुणे ग्रामीण सोबतच कोकण व अन्य भागांमध्ये भातशेतीच्या कामाला सुरुवात झाली आहे.
- 6 / 6
संकटकाळातही आपलं कर्तव्य न विससरता देशसेवा करणाऱ्या या शेतकऱ्यांचं करावं तितकं कौतुक कमीच आहे.