
राज्यात पावसाला पावसाला पोषक परिस्थिती तयार झाल्याने मुंबईसह संपूर्ण किनारपट्टीवर मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होत आहे. (सर्व छायाचित्र – निर्मल हरिंद्रन )
मागील २२ तासांत मुंबईत अतिमुसळधार पावसाची नोंद झाली आहे.
काल झालेल्या मुसळधार पावसामुळे दादरमधील विविध भागातील रस्त्यांवर पाणी साचले होते.
हातातल्या सामानाबरोबरच चप्पला देखील हातात घेऊन नागरिक गुडघ्या इतक्या पाण्यातून वाट काढत होते.
यामुळे नागरिकांना जीवमुठीत धरूनच मार्ग काढावा लागत होता.
मुंबई पोलीस नागरिकांना मदत करत होते.
गुडघ्याच्यावर पाणी साचले असल्याने रस्त्यावरून मार्ग काढताना कसरत करावी लगात होती.
आज (गुरुवार) किनारपट्टीवर मुसळधार तर पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
काही भागात पाणी मोठ्याप्रमाणावर साचलेले असल्याने, विद्यार्थ्यांसह नागरिकांनी मानवी साखळी तयार करून मार्ग काढला.
दक्षिण महाराष्ट्र ते केरळ किनारपट्टीलगत सध्या कमी दाबाचा पट्टा असल्याने राज्यात पावसासाठी पुन्हा अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे.