चिंता करतो विश्वाची…
- 1 / 7
शहरातली वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता पुण्यात पुन्हा एकदा लॉकडाउन जाहीर करण्यात आलं. या काळात अनावश्यक घराबाहेर पडणाऱ्या लोकांची चौकशी करण्याचं काम पोलीस यंत्रणेवर आहे. गेल्या काही महिन्यांपासून सर्व पोलीस यंत्रणा खडतर काळातही आपलं काम व्यवस्थित बजावत आहेत.
- 2 / 7
करोनाचा सामना करताना अनेक पोलिसांना आपले प्राण गमवावे लागले. पुणे वाहतूक पोलीस शाखेत कार्यरत असलेल्या संदीप शेडजाळे हे अधिकारी ड्युटीवर असताना आपली विशेष काळजी घेत आहेत. (सर्व छायाचित्र - अरुल होरायझन)
- 3 / 7
माऊथ सॅनिटायजर, ग्लोव्ह्ज, फेस शिल्ड मास्क आणि सोबत गरम पाण्याची बाटली...आपल्या ८ तासाच्या शिफ्टसाठी संदीप पूर्ण तयारीनीशी रस्त्यावर उतरतात.
- 4 / 7
मुळचे कर्नाटकचे असलेले संदीप शेडजाळे हे शिवाजीनगर पोलीस लाईन भागात राहतात. या भागातही करोनाग्रस्त रुग्ण आढळल्यामुळे आपली व आपल्या परिवाराची काळजी घेण्याची जबाबदारी आपल्यावरच असल्याची जाण संदीप यांना आहे.
- 5 / 7
संदीप यांचे वडीलही माजी पोलीस अधिकारी होते. आपल्या वडीलांचा वारसा पुढे चालवत संदीप सध्याच्या खडतर काळात आपलं कर्तव्य बजावत आहेत.
- 6 / 7
सध्या काही नियमांमध्ये शिथीलता असली तरीही रस्त्यावर येणाऱ्या प्रत्येक गाडीची कसून चौकशी केली जात आहे.
- 7 / 7
शहरातील वाढत्या रुग्णसंख्येवर आळा घालण्यासाठी आरोग्य यंत्रणेसह पोलीस यंत्रणाही महत्वाची भूमिका बजावत आहे.