दिलासा! ‘या’ क्षेत्रांमध्ये वाढल्या नोकरीच्या संधी
- 1 / 10
करोना आणि लॉकडाउनचा प्रचंड मोठा फटका अर्थव्यवस्थेला आणि पर्यायानं उद्योगांसह सेवाक्षेत्राला बसला. तब्बल दोन अडीच महिने सर्व व्यवहार ठप्प झाल्यानं मोठी आर्थिक झळ बसली. त्यामुळे नोकर भरतीची प्रक्रिया ठप्प झाल्यानं बेरोजगारी वाढली. (फोटो : इंडियन एक्स्प्रेस)
- 2 / 10
सर्वच क्षेत्रामध्ये कामगार कपातीची पावलं टाकण्यात आली. एकीकडे नोकरीच्या संधी ठप्प झाल्या असल्यानं दुसरीकडे करण्यात येणाऱ्या कामगार कपातीमुळे निराशेचं वातावरण तयार झालं होतं. मात्र, लॉकडाउन हळूहळू शिथिल केल्यानंतर नोकऱ्यांची संधी वाढू लागली आहे.
- 3 / 10
नोकरी डॉट कॉमनं जाहीर केलेल्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. जून महिन्यात भरती प्रक्रियेत वाढ असून, मागील महिन्याच्या तुलनेत ही वाढ ३३ टक्के जास्त आहे. फार्मास्युटीकल क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात भरती प्रक्रिया सुरू झाली असल्याचं अहवालात म्हटलं आहे. (फोटो : इंडियन एक्स्प्रेस/Illustration by C R Sasikumar)
- 4 / 10
फार्मास्युटीकल क्षेत्राबरोबरच इतर मुख्य ६ क्षेत्रांमध्ये नोकरीच्या संधीमध्ये वाढ झाली आहे.
- 5 / 10
फार्मास्युटीकल क्षेत्रात नोकरीच्या संधी जून महिन्यात २७ टक्क्यांनी वाढल्या आहेत. औषधी निर्माण कंपन्यांचं हब असलेल्या हैदराबाद आणि कोलकातामध्ये सर्वात कमी कामगार कपात बघायला मिळाली आहे.
- 6 / 10
औषधनिर्माण क्षेत्रापाठोपाठ आयटी क्षेत्रही जोर धरताना दिसत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा नोकरी संधीमध्ये वाढ झाली आहे. करोना काळाचा आयटी सेक्टरवर सर्वात कमी परिणाम झाल्याचं रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. जून महिन्यात या क्षेत्रात १९ टक्क्यांनी नोकरीच्या संधी वाढल्या आहेत. (PTI Photo/Atul Yadav)(PTI)
- 7 / 10
बीपीओ सेक्टरमध्ये नोकरीच्या संधीमध्ये वाढ झाल्याचं अहवालात म्हटलं आहे. जून महिन्यात या क्षेत्रामध्ये नोकरीच्या संधीमध्ये तब्बल ४८ टक्क्यांनी वाढल्याचं दिसून आलं आहे. बंगळुरू आणि पुण्यात या दोन शहरात हे प्रामुख्यानं दिसून आली.
- 8 / 10
हॉस्पिटॅलिटी आणि ट्रॅव्हलिंग क्षेत्राला लॉकडाउन आणि करोनाचा प्रचंड मोठा फटका बसला. मात्र, या क्षेत्रामध्येही जूनमध्ये चांगली परिस्थिती निर्माण झाली असून, भरती प्रक्रियेमध्ये १०७ टक्क्यांची वाढ दिसून आली आहे. (indian express/Illustration by CR Sasikumar)
- 9 / 10
करोना संकटामुळे रिटेल सेक्टरालाही मोठी झळ सहन करावी लागली. मात्र, लॉकडाउनमध्ये शिथिलता आणण्यात आल्यानंतर रिटेल सेक्टरमध्येही काहीस आशादायक वातावरण निर्माण झालं आहे. जून महिन्यात या सेक्टर नोकरीच्या संधी ७७ टक्क्यांनी वाढल्या आहेत.
- 10 / 10
लॉकडाउनमध्ये आणखी शिथिलता आणल्यानंतर या क्षेत्रामध्ये नोकरीच्या संधी आणखी वाढण्याची शक्यता अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.