एकेकाळी नववी नापासचा शिक्का, आता त्याच इयत्तेच्या पुस्तकात धडा; सोलापुरच्या पोराची यशोगाथा
- 1 / 20
आकाशाची उंची किती असते? कुणी सांगू शकेल का? ती जाणून घ्यायची असेन तर एकच करावं लागेल. थेट एव्हरेस्ट सारख्या उंच शिखरावर भारताचा तिरंगा मानाने रोवणाऱ्या सोलापूरच्या मराठमोळ्या आनंद बनसोडेला विचारावी लागेल आकाशाची उंची..
- 2 / 20
तुफान यशाचा धनी आणि जगातील सर्वोच्च शिखरावर आपलं नाव कोरून आलेला आनंद वास्तविक जीवनात आपले पाय मातीत घट्ट रोवून बसलेला आहे.जन्माला आल्यावर सर्वात आधी काही बघितलं असेल तर ती होती गरीबी. दहा बाय दहा च्या चौकोनी झोपडीत आनंदचं बालपण रांगायला लागलं.वडील पंक्चर दुरुस्तीचा व्यवसाय करत कुटुंबाचा गाडा चालवीत होते.आनंद याच वातावरणात मोठा होत होता.
- 3 / 20
लहानपणापासून स्वभावाने बुजरा असलेला आनंद अभ्यासात अजिबात विशेष नव्हता.साधं बोलायचंही धाडस नसलेला आनंद आपल्या कमकुवत वृत्ती ने सर्वांसाठीच चिंतेचा विषय ठरला होता.नववीत नापास झाल्यावर मुख्याध्यापकांनी केलेल्या अपमानाने आईच्या डोळ्यातील अश्रू आनंदने बघितले. आणि त्याच वेळी ठरवलं की काहीही होऊ देत,पण आता खूप मोठं व्हायचं.
- 4 / 20
मेहनतीच्या जोरावर पुढे आनंद दहावीच्या परीक्षेत शाळेतून पहिला आला.पुढे विज्ञान शाखेत प्रवेश घेवून 12 वी नंतर आनंदने बीएस्सी फिजिक्स ला ऍडमिशन घेतले. पण त्याला लहानपणीचे स्वप्न स्वस्थ बसू देत नव्हते.
- 5 / 20
गिर्यारोहण प्रशिक्षणासाठी कोणी मार्गदर्शक भेटेल या आशेने त्याने अनेकांच्या भेटी घेतल्या. शेवटी पुण्यात अश्या मार्गदर्शकाचा शोध घेण्याचे त्याने ठरवले. पुण्यात शोध घेत असताना पुण्यातील प्रतिष्ठित गिर्यारोहक श्री.सुरेश शेळके यांच्याशी आनंदची भेट झाली
- 6 / 20
पहिल्या भेटीतच आनंदने त्यांना त्यांच्या एव्हरेस्ट शिखर सर करण्याच्या स्वप्नांबद्दल सांगितले. सुरेंद्र शेळके सरांच्या मार्गदर्शनाखाली आनंदने सराव सुरू केला.
- 7 / 20
2006 ते 2010 या काळात आनंदने हिमालयातील खडतर प्रशिक्षण पूर्ण केले सोबत शिक्षण सुरू होतेच. 2010 च्या ऑगस्ट मध्ये 19,777 फूट उंचीचे टी-2 हे व्हर्जिन शिखर सर करून या शिखरावर जाणारा पहिला मानव बनण्याचा मान आनंदने मिळवला.
- 8 / 20
टी-२ शिखर सर करून आता एव्हरेस्ट ही आयुष्याची सर्वोच्च उंची गाठण्यासाठी आनंद तत्पर झाला होता. हे यश आनंदला एव्हरेस्टचं स्वप्न दाखवायला आलं होतं. पण एव्हरेस्ट सर करण्याचं स्वप्न इतकंही सोपं नव्हतं.
- 9 / 20
जवळजवळ २०-२५ लाख खर्च होता.एवढे सगळे पैसे आणायचे कुठून हा भला मोठा प्रश्न आनंद समोर होता.२०० बड्या नेत्यांना, व्यावसायिकांना भेटूनही पैश्याची व्यवस्था होवू शकली नाही.उलट जागोजागी निव्वळ अपमानच झेलावा लागला.पण अपमान पचवून आनंद सर्व काही सोडून स्वतःच्या स्वप्नपूर्तीसाठी अमेरीकेला गेला.
- 10 / 20
2011 मधील 6 महिने अमेरिकेत राहून आनंदच्या मित्राच्या मदतीने थोडेफार पैसे आनंदला मिळाले. या काळात आनंदने कॅलिफोर्निया राज्यातील माउंट शास्ता हे शिखर 15 ऑगस्ट 2011 रोजी सर करून त्यावर भारताचे राष्ट्रगीत वाजवले. 2012 च्या सुरवातीला आनंद भारतात आला.
- 11 / 20
एव्हरेस्टसाठी अजूनही आनंदकडे एव्हरेस्टसाठी पुरेसे पैसे नव्हते. त्यावेळी त्याच्या आई- वडिलांनी सर्व काही पणाला लावून आनंदला एव्हरेस्ट साठी मदत केली.
- 12 / 20
घरी आई वडील,बहिणी आणि जावई या सर्वांनी आपले दागिने व सम्पत्ती गहन ठेवून आनंदसाठी २0 लाख रुपये गोळा केले. 23 मार्च 2012 ला आनंद एव्हरेस्ट मोहिमेवर निघाला.२९०२८ फूट उंची असलेल्या माऊंट एव्हरेस्टवर आनंद ने १९ मे २०१२ रोजी एव्हरेस्टच्या शिखर सर करून सर्वोच्च अभिमानाची कामगिरी केली.
- 13 / 20
ह्या क्षणापासून आनंदने कधी मागे वळून बघितलेच नाही.सतत चालत रहायचं आणि अनेक यशाची शिखरं पादाक्रांत करत राहायची हा ध्यास घेत आनंदने पुढे ऑस्ट्रेलियातील १० शिखरं सर केले.ही शिखरे सर करणाऱ्या प्रथम भारतीय टीमचे नेतृत्व आनंदने केले.
- 14 / 20
आशिया, आफ्रिका, युरोप, ऑस्ट्रेलिया या खंडांवरील चार सर्वोच्च शिखरे आतापर्यंत सर करून या शिखरांवर गिटारवर राष्ट्रगीत वाजविण्याचा आगळावेगळा विश्वविक्रम आनंदच्या नावावर कोरल्या गेला आहे. लिम्का बुक,इंडिया बुक,युनिक वर्ल्ड यातही आनंदने विक्रम नोंदवला आहे.
- 15 / 20
आनंद वेगवेगळ्या 62 पुरस्कारांनी सन्मानित झाला आहे.युनायटेड नेशन्स येथील "HeForShe" या चळवळीसाठी आनंद सध्या काम करतो आहे.
- 16 / 20
"गर्ल रायझिंग" चा Ambassador म्हणून आनंदची निवड झाली आहे.आनंद आज लाखो युवकांसमोर प्रेरणादायी वक्ता म्हणून उभा राहतो.त्याची आजवर सहा पुस्तकं प्रकाशित झाली आहेत.
- 17 / 20
एके काळी नववीत नापास झालेल्या आनंदचा आता नववीच्या हिंदीच्या पाठयपुस्तकात धडा आहे.
- 18 / 20
यशाच्या सर्वोच्च शिखरावर स्वतःच्या कर्तृत्वाने आनंदने त्याचे नाव कोरले आहे.
- 19 / 20
गरीबी, लाचारी,नकारात्मकता कधीही यशाआड येत नसते.यश आपल्याच हातात असतं.पण त्यासाठी हवी असते जिद्द,चिकाटी आणि मेहनत.
- 20 / 20
आनंदच्या यशाचं गमक हेच आहे. ह्याच त्रिसूत्री वर जीवन जगणाऱ्या आनंदची यशोगाथा अनेक युवकांसाठी प्रेरणादायी ठरेन यात तीळमात्रही शंका नाही.