रुळावर येण्यासाठी मुंबापुरी सज्ज, मॉलचे सॅनिटायजेशन सुरु…
- 1 / 13
टाळेबंदी शिथिलीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात राज्य सरकारने ५ ऑगस्टपासून मॉल खुले करण्यास परवानगी दिली आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी मुंबईतील लोअर परळ भागातील फिनिक्स मॉलचे संपूर्ण सॅनिटाइझेशन करण्यात आले. (सर्व फोटो - गणेश शिरसेकर)
- 2 / 13
मॉल सरु होण्या अगोदर मॉलमधील व मॉल बाहेरील परिसराची संपूर्ण स्वच्छता करण्यात आली.
- 3 / 13
करोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी घालून देण्यात आलेल्या नियमानुसार मॉलमध्ये उपाययोजना असणार आहेत.
- 4 / 13
मॉल सुरू होणार असल्याने तेथील दुकानदार, कर्मचारी यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
- 5 / 13
देशात १ सप्टेंबरपासून अनलॉक ४ लागू होणार असून, सध्या अनेक राज्यांमध्ये अशंतः साप्ताहिक स्वरुपात लॉकडाउन लागू केला जात आहे. देशात करोनाची रुग्णसंख्या वाढत असली, तरी अनलॉकच्या चौथ्या टप्प्यात अनेक गोष्टी सुरू करण्याची शक्यता आहे. (फोटो -लोकसत्ता)
- 6 / 13
ही आकर्षण स्थळे बंद असल्याने ग्राहक मॉलमध्ये फिरकतील की नाही, याबाबत मॉलचालकांना शंका आहे.
- 7 / 13
मॉलमधील सर्व दुकानांना दिवसभरात एकच शिफ्ट असणार आहे. तसेच केवळ ३० ते ४० टक्के कर्मचाऱ्यांसाठी परवानगी देण्यात आली आहे.
- 8 / 13
शॉपिंग सेंटर्स असोसिएशन ऑफ इंडियाने तयार केलेली सर्वसाधारण मार्गदर्शक कार्यप्रणाली सध्या इतर राज्यांत ५०० मॉल वापरत आहेत. त्याचाच वापर राज्यातील मॉलसाठी केला जाईल.
- 9 / 13
- 10 / 13
असोसिएशन आणि शासनाच्या नियमाबरोबरच गर्दीचे नियंत्रण सुकर होण्यासाठी अॅपद्वारा पूर्वनोंदणीची सुविधादेखील अनेक मॉलमध्ये दिली जाणार आहे.
- 11 / 13
संघटनेच्या आकडेवारीनुसार राज्यात सुमारे ७५ खरेदी संकुले, मॉल आहेत.
- 12 / 13
त्यापैकी सुमारे ५० टक्के हे मुंबई आणि महानगर परिसरात, तर पुणे परिसरात २० टक्क्यांपेक्षा अधिक आणि उर्वरित इतर मोठय़ा शहरात आहेत.
- 13 / 13
प्रत्येक मॉलमागे दुकानांतील कर्मचारी, सुरक्षा कर्मचारी, व्यवस्थापन, इतर सुविधा पुरवणारे कर्मचारी असे सुमारे तीन ते चार हजार कर्मचारी कार्यरत असतात.