NDRF जवानांसाठी Sealegs बोटीचं प्रात्यक्षिक
- 1 / 7
गेल्या काही वर्षांत देशातील प्रमुख राज्यांना बसणारा पुराचा फटका लक्षात घेता NDRF चं स्वतंत्र युनिट प्रत्येक राज्यात तयार करण्यात आलंय. पुर परिस्थितीत अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचं काम NDRF चे जवान करतात.
- 2 / 7
आधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण अशी Sealegs 6m RIB ही बोट नुकतीच भारतात दाखल झाली आहे.
- 3 / 7
पुण्यातील आंबेगाव खुर्द तालुक्यातील जांभिळवाडी तलावात या बोटीचं प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं. (सर्व छायाचित्र - पवन खेंगरे)
- 4 / 7
प्रात्यक्षिक दाखवताना कर्मचारी...
- 5 / 7
ITUS Marine & Transport Systems या खासगी कंपनीने NDRF आणि फायर ब्रिगेडच्या जवानांसाठी हे प्रात्यक्षिक आयोजित केलं होतं.
- 6 / 7
गेल्या काही वर्षांत कोल्हापूर, नाशिक, सांगली यासारख्या शहरांत NDRF आणि फायर ब्रिगेडच्या अधिकाऱ्यांनी जिवावर उदार होत नागरिकांना पुरातून बाहेर काढलं होतं.
- 7 / 7
अनेकदा बचाव यंत्रणांकडे लोकांना सुरक्षित स्थळी आणण्यासाठी बोटची कमतरता असायची, त्यामुळे ही बोट NDRF च्या ताफ्यात दाखल झाल्यास NDRF जवानांचं काम अधिक सुकर होणार आहे.