पुण्यात ८०० बेडचे जम्बो कोविड रुग्णालय; युद्धपातळीवर काम सुरु
- 1 / 8
पुणे: वाढत्या करोनाबाधितांच्या संख्येच्या पार्श्वभूमीवर शहरात ८०० बेडचे जम्बो कोविड केअर सेंटर उभारण्यात येत आहे. (सर्व छायाचित्रे - अरुल होरायझन)
- 2 / 8
शिवाजीनगर येथील सीओईपीच्या मैदानावर याची युद्धपातळीवर तयारी सुरु आहे.
- 3 / 8
यासाठी मोठ्या प्रमाणावर यंत्रणा काम करीत असून अनेक कामगार रात्रंदिवस झटत आहेत.
- 4 / 8
हे तात्पुरत्या स्वरुपातील जम्बो कोविड रुग्णालय असून एकाच वेळी ८०० रुग्णांवर येथे उपचार करता येणार आहेत.
- 5 / 8
या रुग्णालयाच्या उभारणीसाठी येथे मोठ्या प्रमाणावर यंत्रसामुग्री आणण्यात आली आहे.
- 6 / 8
सध्या पुणे शहरात सातत्याने पाऊस पडत असून यामुळे या कामात काही प्रमाणात अडथळे येत आहेत.
- 7 / 8
अशा प्रकारे आणखी दोन कोविड केअर सेंटर शहरात उभारण्यात येणार आहेत.
- 8 / 8
पुण्यातील मध्यवर्ती शिवाजीनगर भागात हे रुग्णालय उभारण्यात येत असल्याने ते विविध भागातील रुग्णांसाठी सोयीचं ठरणार आहे.