मराठवाड्याचा पाणीप्रश्न सुटणार; बोगद्याचं ८० टक्के काम पूर्ण
- 1 / 10
नीरा नदीतून उजनी धरणात जमिनीखालून पाणी घेऊन जाण्यासाठी २४ किलोमीटर लांबीचा बोगदा खोदण्याचे काम ८० टक्के पूर्ण झाले आहे. (सर्व छायाचित्रे - कालिदास म्हेत्रे)
- 2 / 10
पाच विविध राज्यातील सुमारे ३००० हजार कामगार त्यासाठी रात्रंदिवस काम करीत आहेत.
- 3 / 10
जमिनीखाली सरासरी ४५ मीटर खोल हे काम केले जात आहे. याची किमान खोली १३० फूट तर कमाल खोली २९० फूट आहे.
- 4 / 10
साधारणपणे २४ मजली इमारतीच्या उंची इतक्या खोलवर हे काम सुरू आहे.
- 5 / 10
बोगद्यात उतरण्यासाठी आणि आतील खोदकाम झालेले साहित्यवर काढण्यासाठी २४ किलोमीटरवर आठ ठिकाणी १५ बाय ८ मीटर आकाराच्या विहिरी खोदण्यात आल्या आहेत.
- 6 / 10
या विहिरीच्या माध्यमातून क्रेनच्या सहाय्याने बोगद्यात जेसीबी, पोकलेन, ट्रक, जीप खाली सोडण्यात आल्या आहेत. एका वेळी बोगद्यात दोन ट्रक सहज ये जा करू शकतात.
- 7 / 10
हा बोगदा म्हणजे अभियांत्रिकीचा अद्भुत आविष्कार आहे. दोनशे फूट खोलीवर ऑक्सिजनचे प्रमाण कमी पडू नये यासाठी वरून दोन मोठ्या ब्लॉअरद्वारे आतमध्ये ऑक्सिजन सोडले जाते.
- 8 / 10
सहा तास ड्रीलिंग, त्यानंतर सहा तास त्यात जिलेटीन भरण्याचे काम त्यानंतर स्फोट आणि सर्वात शेवटी स्फोटामुळे मोकळे झालेले साहित्य वर काढणे असा सध्या इथला नित्यक्रम आहे.
- 9 / 10
दरमहा १२० मीटर काम या पद्धतीने पूर्ण केले जात आहे.
- 10 / 10
कृष्णा खोऱ्यातील २१ टीएमसीपैकी सात टीएमसी पाणी मराठवाड्याला मिळण्याचा मार्ग आता या बोगद्यामुळं मोकळा झाला आहे.