गणपती बाप्पा मोरया…आले रे आले गणपती आले….
- 1 / 10
गणेशोत्सव एका दिवसावर येऊन ठेपलेला असताना, पुण्यातील अनेकांनी आपल्या लाडक्या बाप्पाला जयघोष करत घरी आणल्याचे दिसून आले. (सर्व फोटो - अरुल होराझन)
- 2 / 10
कोरना महामारीच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर यंदा जरी गणेशोत्सव साजरा करण्यावर काहीसे निर्बंध आलेले असले, तरी गणेश भक्तांचा उत्साह मात्र तोच आहे.
- 3 / 10
गणरायाला घरी आणण्यासाठी बाहेर पडलेल्या पुणेकरांनी करोना संसर्ग टाळ्याच्या दृष्टीने तोंडाला मास्क बांधल्याचे दिसून आले.
- 4 / 10
पारंपारिक वेशात व गणरायाचा जयघोष करत गणरायाची सुंदर मुर्ती घरी नेताना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसत होता.
- 5 / 10
करोना महामारीमुळे सर्वच सण, उत्सवांवर मर्यादा आलेल्या आहेत. आता गणराया तूच या संकटातून सर्वांची सुटका कर अशीच मनोमन प्रार्थना प्रत्येकजण करत असणार.
- 6 / 10
- 7 / 10
गणेशोत्सव आणि विसर्जन मिरवणूकीला मोठी परंपरा आहे. परंतु यावर्षी करोनाची महामारी असल्यामुळे संसर्ग रोखण्यासाठी घरगुती स्वरुपात गणेशोत्सव साजरा करणे आवश्यक आहे.
- 8 / 10
गणरायाच्या स्वागतासाठी पुणेकरांनी शहरातील मंडई परिसरातील बाजारापेठेत विविध वस्तूंच्या खरेदीसाठी शुक्रवारी गर्दी केली होती.
- 9 / 10
या वेळी नागरिकांनी नियमांचे पालन करावे यासाठी पोलीस सूचना करत होते.
- 10 / 10
करोना संसर्गाच्या धाकधुकीतही कुठतरी नागरिकांना गणरायाच्या आगमानाची आस लागलेली होती.