भिंत खचली, चूल विझली….! अंगावर शहारा आणणारी महाड दुर्घटनेची दृश्य
- 1 / 15
महाड येथील काजळपुरा परिसरातील तारीक गार्डन ही पाच मजली इमारत सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास कोसळली.
- 2 / 15
पाच वर्षांपूर्वी या इमारतीचे बांधकाम करण्यात आले होते. त्यात ४५ कुटुंबे राहात होती. दुपारनंतर इमारत खचण्यास सुरुवात झाली. त्यामुळे २५ कुटुंबांनी सुरक्षितस्थळी स्थलांतर केले.
- 3 / 15
संध्याकाळी सातच्या सुमारास इमारत कोसळली. इमारतीचे वरचे तीन मजले पूर्णपणे उद्ध्वस्त झाले.
- 4 / 15
दुर्घटनेनंतर नगरपालिका, स्थानिक प्रशासन, पोलीस आणि सामाजिक संस्थांच्या साह्यने मदतकार्य सुरू करण्यात आले.
- 5 / 15
या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत दोघांचा मृत्यू झाला आहे. तर सात जखमींवर महाड येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
- 6 / 15
इमारतीच्या ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आलेल्याना महाड येथील ट्रॉमाकेअर सेंटर आणि खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
- 7 / 15
राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या तीन तुकडय़ांनी तात्काळ बचावकार्याला सुरुवात केली.
- 8 / 15
साधारणपणे पाच वर्षांपूर्वी तळोजा येथील पटेल आणि युनूस शेख या बांधकाम व्यावयायिकांनी या पाच मजली इमारतीचे बांधकाम केले होते.
- 9 / 15
गेल्या काही महिन्यांपासून इमारतीला तडे जात असल्याची तक्रार रहिवाशांनी विकासकाकडे केली होती. मात्र, या तक्रारींकडे त्यांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.
- 10 / 15
इमारत दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमदार भरत गोगावले आणि जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याशी चर्चा केली. जलदगतीने बचावकार्य आणि मदतकार्यासाठी सरकारतर्फे सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
- 11 / 15
इमारत दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमदार भरत गोगावले आणि जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याशी चर्चा केली. जलदगतीने बचावकार्य आणि मदतकार्यासाठी सरकारतर्फे सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
- 12 / 15
महाड येथील काजळपुरामध्ये झालेल्या इमारत दुर्घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दु:ख व्यक्त केलं आहे. पंतप्रधान कार्यालयाच्या ट्विटर हॅण्डलवरुन यासंदर्भात ट्विट करण्यात आलं आहे. या दुर्घटनेमध्ये जखमी झालेल्या सर्वांना तातडीने मदत करण्याचे काम सुरु असल्याचेही पंतप्रधांनी म्हटलं आहे.
- 13 / 15
घटनास्थळावरील मदत व बचावकार्याची रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी पहाणी केली आहे. जिल्हाधिकारी निधी चौधरी, पोलीस अधिक्षक अनिल पारस्कर घटना स्थळावर उपस्थित आहेत. बांधकाम व्यवसायिकावर चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरु करण्यात आली आहे.
- 14 / 15
आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत ६० जणांची सुटका करण्यात आली आहे. रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत दोन जणांचा मृत्यू झाला असून १८ जण ढिगाऱ्याखाली अडकले आहेत.
- 15 / 15
“जखमींवर उपचार सुरु असून काहींना डिस्चार्जही देण्यात आला आहे. जे गंभीर जखमी आहेत, त्यांना उपचारासाठी मुंबईत नेण्यात येत आहे. या दुर्घटनेची चौकशी सुरु झाली आहे. चौकशीसाठी विशेष तपास पथक नेमावे” अशी मागणी आदिती तटकरे यांनी केली आहे.