पुण्यातील वाहतूक नियंत्रण आता महिला पोलिसांच्या हाती
- 1 / 10
मार्च महिन्यात पुणे शहरात पोलीस आयुक्तांनी महिला दिन साजरा करण्यासाठी वाहतूक नियंत्रण ठेवण्यासाठी ३६ महिला पोलिसांची निवड केली होती. फरासखाना पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणारी वाहतूक सांभाळण्याची जबाबदारी या महिला पोलिसांवर होती. (सर्व छायाचित्र - पवन खेंगरे)
- 2 / 10
मात्र यानंतर करोनामुळे संपूर्ण महाराष्ट्रात लॉकडाउन जाहीर झालं, लोकांना विनाकारण घराबाहेर पडण्यास बंदी घालण्यात आली. त्यामुळे या महिला पोलिसांना परत इतर कामं देण्यात आली.
- 3 / 10
परंतू काही दिवसांपूर्वीच लॉकडाउन संपवून अनलॉकची घोषणा करण्यात आल्यानंतर आता पुण्यातील रस्त्यांवर हळुहळु परिस्थिती पूर्ववत व्हायला लागली आहे.
- 4 / 10
महिला पोलीस अधिकारी स्वाती डुंबरे-थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली या महिला पोलीस अधिकारी पुन्हा एकदा शहरात वाहतूक नियंत्रणाच्या कामाला लागल्या आहेत.
- 5 / 10
फरासखाना पोलीस ठाण्याअंतर्गत अनेक रस्ते हे रुंद असल्यामुळे महिला पोलिसांसासाठी सायकलची सोय करुन देण्याचा विचार असल्याचंही डुंबरे यांनी सांगितलं.
- 6 / 10
प्रत्येक दिवशी कामावर निघण्याआधी या पोलीस अधिकाऱ्यांना ब्रिफींग दिलं जातं.
- 7 / 10
करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती आणि पाळायचे सर्व नियम याची जबाबदारीही या महिला पोलिसांवर आहे.
- 8 / 10
गेल्या काही महिन्यांत करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे पोलीस यंत्रणेवर मोठा ताण पडला आहे.
- 9 / 10
तरीही कुठेही न थांबता हे पोलीस कर्मचारी आणि अधिकारी शहरातली कायदा-सुव्यवस्था सुरळीत राहण्यासाठी झटत आहेत.
- 10 / 10
वाहतूक नियंत्रण करताना महिला पोलीस कर्मचारी