JEE Main : स्कॅनिंग, सॅनिटायझेशन अन् परीक्षेचं टेन्शन; परीक्षा केंद्रांवर विद्यार्थी दाखल
- 1 / 20
आजपासून (१ सप्टेंबर) सुरू होणाऱ्या ‘जेईई’च्या परीक्षेसाठी विद्यार्थी परीक्षा केंद्रांवर दाखल होऊ लागले आहेत. वेगवेगळ्या राज्यांमधील परीक्षा केंद्रावर विद्यार्थी करोनासंदर्भातील नियमांचे पालन करत दाखल होत असल्याचे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलं आहे. दिल्ली, पश्चिम बंगाल, ओदिशाबरोबरच देशातील अन्य भागांमधून विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर प्रवेश देताना काय काळजी घेण्यात येत आहे यासंदर्भातील फोटो समोर आले आहेत. (सर्व फोटो एएनआय)
- 2 / 20
हा फोटो आहे पश्चिम बंगालमधील परीक्षा केंद्रावरील. येथील प्रवेशद्वाराजवळ सॅनिटायझरची फवारणी केली जात आहे.
- 3 / 20
दिल्लीतील विवेक विहारमधील अर्वाचीन भारती भवन येथील परीक्षा केंद्रावरील.
- 4 / 20
ओडिशामध्ये प्रशासनानेच विद्यार्थ्यांसाठी वाहतुकीची सोय केली आहे.
- 5 / 20
दिल्लीमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे काटेकरोपणे पालन करण्यात येत आहे.
- 6 / 20
विद्यार्थ्यांच्या शरीराचे तापमान तपासूनच त्यांना प्रेवश दिला जात आहे. हा फोटो पश्चिम बंगालमधील आहे.
- 7 / 20
उत्तर प्रदेशमधील गोरखपूर येथील परीक्षा केंद्रावर प्रत्येक विद्यार्थ्याचे तापमान तपासण्याबरोबरच त्याचे फोटो काढून नोंदही ठेवली जात आहे.
- 8 / 20
कर्नाटकमधील परीक्षा केंद्रावरील हे दृष्य. प्रत्येक विद्यार्थ्याला शरीराचे तापमान तपासल्यानंतरच प्रवेश दिला जात आहे.
- 9 / 20
विद्यार्थ्यांची संपूर्ण तपासणी करुनच त्यांना आत प्रवेश दिला जात आहे.
- 10 / 20
- 11 / 20
गुजरातमधील परीक्षा केंद्रांवर प्रवेशद्वाराजवळच सॅनिटायझर आणि इतर सुरक्षेसंदर्भातील उपाययोजना करण्यात आल्यात.
- 12 / 20
ओडिशामधील सरकारी अधिकारी सकाळपासूनच विद्यार्थ्यांना वेळत परीक्षा केंद्रांवर पोहचता यावे म्हणून अगदी कागदोपत्री पुर्ततांपासून इतर गोष्टींची तपासणी करताना दिसत होते.
- 13 / 20
विद्यार्थ्यांना शुभेच्छांबरोबरच वाहतुकीची सोय ओडिशा सरकारने उपलब्ध करुन दिली आहे.
- 14 / 20
"परीक्षा घेतल्या जात आहेत हे आमच्या भविष्याच्या दृष्टीने चांगले आहे," असं ओडिशामधील एका विद्यार्थ्याने एएनआयशी बोलताना सांगितलं.
- 15 / 20
सोशल डिस्टन्सिंगसाठी गुजरातमध्ये अशाप्रकारे उपाययोजना करण्यात आली आहे.
- 16 / 20
पश्चिम बंगालमधील परीक्षा केंद्रावर प्रत्येक विद्यार्थ्याला सॅनिटाइज केलं जात आहे.
- 17 / 20
प्रवेशद्वारावरच बारकोड स्कॅन करुन विद्यार्थ्यांना आसन क्रमांकाची माहिती दिली जात आहे. हा फोटो गोरखपूरमधील आहे.
- 18 / 20
गोरखपूरमध्ये विद्यार्थ्यांना मदत करणारे स्वयंसेवक. अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आलीय.
- 19 / 20
अशाप्रकारे करोनासंदर्भातील नवीन नियम आणि काय काळजी घ्यावी याची माहिती दिली जात आहे.
- 20 / 20
अनेक ठिकाणी परीक्षा केंद्रांबाहेर अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. हे दृष्य आहे कर्नाटकमधील.