राष्ट्रीय कला अकादमीचे रांगोळ्यांमधून प्रबोधन
- 1 / 8
पुणे : पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान ताज्या विषयांवर रांगोळीच्या माध्यमातून प्रबोधन करण्याचे काम राष्ट्रीय कला अकादमीच्या माध्यमातून दरवर्षी केले जाते. (सर्व छायाचित्रे - सागर कासार)
- 2 / 8
यंदा अकादमीने करोनाचा विषय हाती घेतला आहे.
- 3 / 8
अकादमीकडून विसर्जन मार्गावर रांगोळी काढण्याचे यंदाचे २२वे वर्ष आहे.
- 4 / 8
दरवर्षी विसर्जन मार्गावर अकादमीकडून आकर्षक प्रबोधनात्मक रांगोळ्या काढल्या जातात.
- 5 / 8
यंदा अकादमीने करोना विषाणू, कोविड योद्धे यांच्या कार्याला सलाम करणारे संदेश रांगोळींच्या माध्यमातून दिले आहेत.
- 6 / 8
'घरीच रहा सुरक्षित रहा', 'वंदीतो शौर्य तुमचे', 'मैत्री करावी हँडवॉशशी, भीती नसेल करोनाची', 'आरोग्याची कास धरु, करोनावर मात करु' आदी रांगोळीतून दिलेल्या संदेशांद्वारे अकादमीने नागरिकांमध्ये जनजागृती केली.
- 7 / 8
यंदा करोनामुळं विसर्जन मिरवणुकांवर बंदी असल्याने अकादमीकडून मानाच्या गणपतींच्या उत्सव मंडपांबाहेर रांगोळ्या काढण्यात आल्या.
- 8 / 8
राष्ट्रीय कला अकादमीच्या अनेक स्वयंसेवकांनी विसर्जनाच्या दिवशी सकाळपासूनच या कार्यात सहभाग घेतला होता.