पुण्यातील मानाच्या गणपतींचे विसर्जन
- 1 / 6
पुणे : देशात सर्वात मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक गणेशोत्सव पुण्यात साजरा होतो. यंदा करोनाच्या संकटामुळे हा उत्सव अत्यंत साध्या स्वरुपात साजरा करण्यात आला. पुण्यातील पाच मानाचे गणपती आणि अनेक दशकांची परंपरा असलेल्या तीन सार्वजनिक गणपतींचे विसर्जन झाल्यानंतरच विसर्जन मार्गावरील इतर मंडळांच्या गणपतींचे विसर्जन होते. यंदा सर्वच गणपतींचे विसर्जन हे घाटावर न होता उत्सव मंडपांमधील कृत्रिम हौदामध्येच केले जाणार आहे. यातील पहिला मानाचा गणपती कसबा गणपतीचे सकाळी ११ वाजून ४४ मिनिटांनी विसर्जन पार पडले. (सर्व छायाचित्रे - सागर कासार)
- 2 / 6
दुसरा मानाचा गणपती तांबडी जोगेश्वरी मंडळाच्या गणपतीचे विसर्जन दुपारी १२ वाजून ४० मिनिटांनी झाले.
- 3 / 6
तिसरा मानाचा गणपती आणि 'पुण्याचा राजा' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुरुजी तालीम मंडळाच्या गणपतीचे दुपारी १२ वाजून ५५ मिनिटांनी विसर्जन झाले.
- 4 / 6
चौथा मानाचा गणपती तुळशीबाग गणपतीचे विसर्जन दुपारी १ वाजून ०५ मिनिटांनी झाले.
- 5 / 6
पाचवा केसरीवाडा गणपतीचे विसर्जन दुपारी १ वाजून ३५ मिनिटांनी झाले.
- 6 / 6
तर पुण्यातील सर्वात जुना श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणेश मंडळाच्या गणपतीचे २ वाजून ४१ मिनिटांनी विसर्जन पार पडले.