कंगना रणौत मुंबई विमानतळावर उतरण्याआधी असा होता बंदोबस्त
- 1 / 10
हिम्मत असेल तर रोखून दाखवा, असे थेट आव्हान देणारी अभिनेत्री कंगना रणौत आज मुंबईत दाखल झाली.
- 2 / 10
मुंबई विमातळाबाहेर शिवसैनिकांनी आंदोलन केले. मुंबईचा अपमान करणाऱ्या कंगना रणौतला अटक करण्याची मागणी केली.
- 3 / 10
कंगनाला मुंबंईत फिरु देणार नाही असा इशारा शिवसैनिकांनी दिला आहे.
- 4 / 10
कंगनाच्या मुंबई आगमनाच्यावेळी शिवसैनिकांकडून विमानतळावर विरोध प्रदर्शन होऊ शकते, ही शक्यता लक्षात घेऊन विमानतळावर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
- 5 / 10
कंगना रणौतच्या जुहू येथील कार्यालयामधील अनधिकृत बांधकामावर मुंबई महापालिकेने हातोड चालवला.
- 6 / 10
महापालिकेने कंगनाला मंगळवारी नोटीस बजावताना २४ तासांची मुदत दिली होती. पण कंगनाने उत्तर न दिल्याने अखेर कारवाईला सुरुवात करण्यात आली.
- 7 / 10
- 8 / 10
कंगना अभिनयाव्यतिरिक्त अनेक सामाजिक विषयांवर परखड मत मांडते. त्यामुळे ती नेहमीच चर्चेत असते.
- 9 / 10
सुशांत सिंह राजपूत प्रकरणातही तिने बॉलिवूडमधल्या घराणेशाहीसह अनेक विषयांवर थेट भाष्य केलं होतं.
- 10 / 10
कंगनाचा क्वीन हा चित्रपट हिट ठरला होता. या चित्रपटामुळे नव्हे पण तिच्या अभिनय कौशल्यामुळे प्रेक्षकांनीच तिला क्वीनची उपाधी दिली आहे.