पुण्यात पावसाचा कहर, पोलीस स्टेशन पाण्यात; रात्रभर टेबलावर बसून सुरु होतं काम
- 1 / 6
पुणे शहर आणि जिल्ह्याला बुधवारी दुपारपासून पावसाने चांगलंच झोडपून काढलं आहे. जोरदार पावसामुळे अनेक सोसायट्यांमध्ये पाणी शिरलं आहे.
- 2 / 6
पुणे शहरातील चंदननगर पोलीस स्टेशनमध्ये पाणी शिरलं होतं.
- 3 / 6
संपूर्ण पोलीस ठाण्यात पाणी झाल्याने कर्मचाऱ्यांना रात्रभर टेबलवर बसून काम करावं लागलं.
- 4 / 6
पाणी इतक्या मोठ्या प्रमाणात झालं होतं की, संपूर्ण रात्र पोलिसांना अशीच काढावी लागली.
- 5 / 6
आणखी दोन दिवस असाच मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेकडून व्यक्त करण्यात आली आहे.
- 6 / 6
यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन देखील करण्यात आलं आहे.