डॉ. अब्दुल कलाम यांचे आयुष्याला प्रेरणा देणारे १० विचार
- 1 / 10
भारताचे दिवंगत माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांची आज जयंती. देशाचे ‘मिसाईल मॅन’ म्हणूनही त्यांना संबोधलं जातं. डॉ. कलाम यांची भाषणं नेहमीच प्रेरणादायी असत. डॉ. कलाम यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या काही निवडक भाषणांतील विचार खास लोकसत्ताच्या वाचकांसाठी देत आहोत.
- 2 / 10
देशात सर्वाधिक बुद्धिमत्ता असलेल्या व्यक्ती शक्यतो वर्गातील शेवटच्या बाकावरचं सापडतात.
- 3 / 10
जेव्हा पाऊस सुरू होतो तेव्हा सर्व पक्षी घरट्यात आसरा घेतात. मात्र, गरूड पावसापासून बचाव करण्यासाठी ढगांवरून उडतो.
- 4 / 10
तुमच्या पहिल्या विजयानंतर विश्रांती घेऊ नका. कारण, दुसऱ्या प्रयत्नात तुम्ही अयशस्वी झालात तर तुमचा पहिला विजय केवळ नशीबाचा भाग होता, असे म्हणायला अनेकजण सज्ज असतात.
- 5 / 10
यशाबद्दलची माझी निष्ठा कणखर असेल तर मला अपयशामुळे कधीच नैराश्य येणार नाही.
- 6 / 10
स्वप्न खरी होण्यासाठी स्वप्नं पाहणं गरजेचं आहे.
- 7 / 10
संकुचित ध्येय बाळगू नका. महान विचारदृष्टी समोर ठेऊन परिश्रम केले तर आपला देश निश्चितपणे एक विकसित राष्ट्र बनेल.
- 8 / 10
एखाद्याचा पराभव करणे फार सोपे असते. मात्र, एखाद्याला जिंकणे खूपचं अवघड असते.
- 9 / 10
स्वप्ने पहा, त्या दिशेने विचार करा व ती कृतीने सत्यात उतरवा.
- 10 / 10
यशस्वी कथा वाचू नका, त्यांनी केवळ संदेश मिळतो. अपयशाच्या कथा वाचा, त्याने यशस्वी होण्यासाठी कल्पना मिळतात.