पावसानंतरचं पुणे…गाड्या, दुकानं तसंच मालमत्तेचं प्रचंड नुकसान
- 1 / 17
पुणे शहर आणि जिल्ह्याला बुधवारी पावसाने जोरदार तडाखा दिला. पावसाचा कहर इतका होता की ठिकठिकाणी घर, दुकानांमध्ये पाणी शिरलं होतं. फोटोंच्या माध्यमातून आपण पावसानंतर पुण्यात नेमकी काय परिस्थिती निर्माण झाली होती हे पाहूयात... (सर्व फोटो - सागर कासार)
- 2 / 17
दगडूशेठ मंदिराजवळचं चित्र असं होतं..
- 3 / 17
पावसामुळे रस्त्यांवर ठिकठिकाणी पाणी साचलं होतं. यामुळे वाहतुकीत अडथळे निर्माण झाले होते. ठिकाण - सिंहगड रोड (सर्व छायाचित्र - सागर कासार)
- 4 / 17
याशिवाय अनेक ठिकाणी रस्त्यांची दुर्देशा झालेली पहायला मिळाली. ठिकाण - सिंहगड रोड
- 5 / 17
पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी पालिका कर्मचाऱ्यांना बरीच मेहनत घ्यावी लागली. ठिकाण - बुधवार पेठ
- 6 / 17
पावसाचा जोर कमी झाल्यानंतर दुकानदार दुकानातील पाणी बाहेर काढत होते. ठिकाण - बुधवार पेठ
- 7 / 17
लॉकडाउनमुळे आधीच आर्थिक संकट कोसळलेल्या दुकानदारांना पावसाच्या संकटाला तोंड द्यावं लागलं, ठिकाण - बुधवार पेठ
- 8 / 17
दुकानात पाणी शिरल्याने अनेकांचं प्रचंड मोठं आर्थिक नुकसान झालं आहे.
- 9 / 17
नुकसानाचा आढावा घेताना दुकानदार
- 10 / 17
दगडूशेठ मंदिराजवळ साचलेलं पाणी
- 11 / 17
काही ठिकाणी रस्त्यांना अक्षरश: तलावाचं स्वरुप आलं होतं.
- 12 / 17
पुणे शहरात १० ठिकाणी झाडं पडल्याची माहिती अग्निशमन विभागाने दिली आहे. ठिकाण - नवी पेठ
- 13 / 17
काही ठिकाणी झाडं गाड्यांवर पडल्याने मोठं नुकसान झालं. ठिकाण - नवी पेठ
- 14 / 17
सिंहगड रोडवर तर पावसामुळे चिखल झाला होता.
- 15 / 17
दुकानदारांना पाऊस ओसरल्यानंतर दुकानासमोरील चिखल काढावा लागला. ठिकाण - सिंहगड रोड
- 16 / 17
याशिवाय बराच कचराही वाहून आला होता. ठिकाण - सिंहगड रोड
- 17 / 17
सिंहगड रोडवरचं हे चित्र पावसाचं भयाण चित्र दर्शवतंय