KBC 12 : ही महिला IPS अधिकारी ठरली दुसरी करोडपती; जाणून घ्या तिच्याविषयी
- 1 / 10
IPS Mohita Sharma : सोनी टिव्हीवरील प्रसिद्ध शो 'कौन बनेगा करोडपती' (KBC 12) च्या १२ व्या हंगामातील दुसरा करोडपती स्पर्धक मिळाला आहे.
- 2 / 10
विशेष म्हणजे.. या हंगामातील दोन्ही करोडपती स्पर्धक महिलाच आहेत..रांची येथील नाजिया नसीम यंदाच्या हंगामातील पहिली करोडपती स्पर्धक ठरली होती. आता या हंगामातील दुसरी करोडपती स्पर्धक दिल्लीची मोहिता शर्मा ठरली आहे.
- 3 / 10
मोहिता शर्मा आयपीएस(IPS) अधिकारी आहेत. जाणून घेऊयात मोहिता शर्मा यांच्याबद्दल
- 4 / 10
३१ वर्षय मोहिता शर्मा मूळच्या हिमाचल प्रदेशमधील कांगडा येथील आहेत. त्यांचं सर्व शिक्षण दिल्लीमध्ये झालं आहे.
- 5 / 10
मोहिता शर्मा या २०१७ बॅचच्या आयपीएस आधिकारी आहेत. सध्या त्या जम्मू-कश्मीरमध्ये कार्यरत आहेत. याआधी मोहिता शर्मा यांनी भारतीय निवडणूक आयोगात काम केलं आहे.
- 6 / 10
मोहिता शर्मा यांचे वडील मानेसर येथील मारुती उद्योग लिमिटेड या कंपनीमधये काम करत होते.
- 7 / 10
मोहिता शर्मा यांनी दिल्लीमधील द्वाराका डीपीएसमध्ये आपलं महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं. तर भारती विद्यापीठातून इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त केली.
- 8 / 10
बीटेकचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर २०१२ पासून मोहिता शर्मा यांनी यूपीएससीची तयारी सुरु केली.
- 9 / 10
पाचव्या प्रयत्नात मोहिता शर्मा यांना यूपीएससीमध्ये यश मिळालं आणि त्या आयपीएस आधिकारी झाल्या.
- 10 / 10
ऑक्टोबर २०१९ मध्ये मोहिता यांनी आयएफएस आधिकारी रुशल गर्ग यांच्यासोबत लग्न केलं.