बाप्पा पावला ! दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी पुणेकरांची गर्दी
- 1 / 10
दिवाळीतील पाडव्याच्या शुभ मुहुर्तावर राज्यातील मंदीर सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. सरकारी नियमांचं पालन करत पुण्यातील दगडूशेठ गणपती मंदीर भाविकांसाठी खुलं झालं आहे. (सर्व फोटो - सागर कासार)
- 2 / 10
सकाळपासून भाविकांनी गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी गर्दी केली होती.
- 3 / 10
मंदीर प्रशासनाकडून स्वच्छता, सॅनिटायजेशन, सोशल डिस्टन्सिंग असे सर्व नियम तंतोतंत पाळले जात आहेत.
- 4 / 10
नकळतपणे हा श्वानही बाप्पासमोर नतमस्तक झाला.
- 5 / 10
काही भाविकांनी मंदीराबाहेर उभं राहून दर्शन घेणं पसंत केलं.
- 6 / 10
पहिल्याच दिवशी २ हजारपेक्षा जास्त लोकांनी दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेतलं.
- 7 / 10
देवदर्शनाला येत असताना सोशल डिस्टन्सिंग आणि भाविकांनी मास्क लावला आहे ना याची काळजी मंदीर प्रशासन घेत आहे.
- 8 / 10
महिला वर्गाचीही पहिल्या दिवशी चांगली उपस्थिती पहायला मिळाली.
- 9 / 10
प्रदीर्घ कालावधीनंतर आपल्या लाडक्या बाप्पाचं दर्शन झाल्यानंतर भाविकांच्या चेहऱ्यावरही एक वेगळाच आनंद दिसून येत होता.
- 10 / 10
मंदीर सुरु झाल्यानंतर पुणे भाजपातर्फे आज महाआरती करण्यात आली.