मंदिरं भाविकांसाठी खुली, ब्राह्मण महासंघातर्फे पुण्यात जल्लोष
- 1 / 7
महाराष्ट्र सरकारने दिवाळीत पाडव्याच्या मुहुर्तावर सर्व मंदीर नियम व अटींसह खुली करण्याची परवानगी दिली. राज्य सरकारच्या या निर्णयाचं पुण्यात अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने स्वागत केलं आहे.
- 2 / 7
पुण्यातील कसबा पेठ गणपतीसमोर आज महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी बँडबाजाच्या जल्लोषात आपला आनंद साजरा केला. (सर्व छायाचित्र - आशिष काळे)
- 3 / 7
करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे राज्यात तब्बल ८ महिने मंदिरं बंद होती. काही दिवसांपूर्वी राज्यात मंदिरं उघडण्यासाठी आंदोलनंही झाली.
- 4 / 7
दिवाळीच्या मुहुर्तावर मंदिरं उघडण्यात आल्यामुळे सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.
- 5 / 7
महासंघाच्या पदाधिकाऱ्यांतर्फे कसबा पेठ गपणतीची आरतीही करण्यात आली.
- 6 / 7
मध्यंतरी या प्रकरणावरुन महाराष्ट्रात चांगलंच राजकारण रंगलं होतं.
- 7 / 7
मंदिर उघडताना राज्य सरकारचे सर्व नियम पाळले जातील याची तंतोतंत काळजी घेण्यात आली आहे.