सुप्रिया मला म्हणाली, ‘गप्प बस… ऐकून घे’ -अजित पवार
- 1 / 10
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची बोलण्याची शैली अवघ्या महाराष्ट्राला परिचित आहे. अजित पवारांच्या विनोदी शैलीमुळे नेहमीच लोकांमध्ये हास्याचे कारंजे उडाताना दिसते. हाच अनुभव शनिवारी आला. (सर्व छायाचित्रं संग्रहित असून, प्रातिनिधीक स्वरूपात वापरलेली आहेत)
- 2 / 10
निमित्त होतं शरद पवार यांच्या वाढदिवसाचं. शरद पवारांचं अभिष्टचिंतन करण्यासाठी ८ दशकं कृतज्ञतेची कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी मनोगत व्यक्त करताना अजित पवारांनी त्यांनी ऐकलेल्या लहानपणीच्या गोष्टींचा किस्सा सांगितला.
- 3 / 10
शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शरद पवार यांच्या कार्यांचा आढावा घेत मनोगतं व्यक्त केली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही मनोगत व्यक्त केलं.
- 4 / 10
अजित पवार म्हणाले,"मी पण सगळ्यांची भाषणं ऐकत होतो. साधारण वयाच्या दहाव्या वर्षापासून जे काही चित्र आहे. ते माझ्या डोळ्यासमोर जात होतं. ५० वर्षांचा पवार साहेबांचा कार्यकाळ डोळ्यासमोरून गेला. या सगळ्या नेत्यांची भाषण ऐकत असताना... मी माझ्या आजी-आजोबांच्या जवळ लहानाचा मोठा झालो. काही काही गोष्टींबद्दल ज्ञानामध्ये भर पडली."
- 5 / 10
"पवार साहेबांबद्दल जे कधी आजी-आजोबांकडून ऐकायला मिळालं नव्हतं. ते वेगवेगळ्या नेत्यांकडून ऐकायला मिळालं." (सर्व छायाचित्रं संग्रहित असून, प्रातिनिधीक स्वरूपात वापरलेली आहेत)
- 6 / 10
संग्रहित
- 7 / 10
संग्रहित
- 8 / 10
"१२ डिसेंबर हा आपल्या सर्वांसाठी आनंदाचा क्षण आहे. तो क्षण आज आपण एकत्र घालवला याचा आनंद होतोय. राज्यात मोठ्या प्रमाणावर रक्ताचा तुटवडा भासत आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राज्यभरात रक्तदान शिबिरांचे आयोजन केले आहे. हे काम आपल्याला पुढे न्यायचे आहे कारण राज्यावर संकट आल्यानंतर आपण धावून गेले पाहिजे, ही पवार साहेबांची शिकवण आहे, असे अजित पवार म्हणाले.
- 9 / 10
मागील ५० वर्षांपासून आपण पवार साहेबांना सामाजिक जीवनात काम करताना पाहतोय. ८० व्या वर्षीही ते त्याच ताकदीने काम करत आहेत. मला तर वाटतं, पवार साहेबांसारखा नेता या शतकात तरी होणार नाही."
- 10 / 10
"पवार साहेबांसारखे नेते आपल्याकडे आहेत, याचा मला अभिमान आहे. राज्यातील १३ कोटी जनतेच्या वतीने आणि उपमुख्यमंत्री या नात्याने हिमालयाच्या उंचीच्या महाराष्ट्राच्या या सह्याद्रीला मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा," असं म्हणत अजित पवार यांनी शरद पवार यांचं अभिष्टचिंतन केलं. (सर्व छायाचित्रं संग्रहित असून, प्रातिनिधीक स्वरूपात वापरलेली आहेत)