कोल्हापुरकरांचं कामच भारी! झाडांची केली वेदनेतून मुक्ती
- 1 / 10
आमचं ठरलंय म्हणत राजकारणात रंग भरणारे कोल्हापुरकर पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळी चर्चेत येण्याचं कारण राजकारण नाही, तर तुम्हालाही सुखावून जाईल, असं काम येथील नागरिकांनी सुरू केलं आहे. (छायाचित्रं सौजन्य/सतेज पाटील, ट्विटर हॅण्डल)
- 2 / 10
वृक्षारोपण जशी काळाची गरज आहे तशीच वृक्ष संवर्धन सुद्धा तितकेच महत्वाचे आहे, असं म्हणत कोल्हापूरकर रविवारी रस्त्यावर उतरले.
- 3 / 10
झाडांवर जाहिराती असल्याचं आपल्याला सर्रास बघायला मिळतं. पण, या जाहिरातींसाठी झाडांना अक्षरक्षः खिळे ठोकून एकप्रकारे जखमीच करून टाकलं जातं.
- 4 / 10
हे लक्ष्यात आल्यानंतर कोल्हापुरातील संवेदनशील आणि वृक्षप्रेमी शांत कसे राहणार? मग त्यासाठी एक उपक्रम हाती घेण्यात आला.
- 5 / 10
शहरात खिळे मारून जाहिरात करण्यात आलेल्या झाडांचे संवर्धन व्हावे, यासाठी "खिळेमुक्त झाडांचं कोल्हापूर" हा व्यापक उपक्रम कोल्हापुरातील स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने संपूर्ण कोल्हापूर मध्ये राबविण्यात आला. (छायाचित्रं सौजन्य/सतेज पाटील, ट्विटर हॅण्डल)
- 6 / 10
"खिळेमुक्त झाडांचं कोल्हापूर" उपक्रमासाठी सुटीचा दिवस म्हणजेच रविवारची निवड करण्यात आली.
- 7 / 10
उपक्रम राबवण्याआधी एक आवाहनही करण्यात आलं. 'ज्या लोकांनी अथवा व्यावसायिकांनी झाडांवर खिळे मारून जाहिरात अथवा कोणत्याही प्रकारचे फलक लावले असतील, त्यांनी ३ जानेवारीपूर्वी स्वतःहून खिळ्यासह फलक काढून घ्यावेत', असं.
- 8 / 10
आवाहन करून झाल्यानंतर रविवारी कोल्हापूरकर झाडांना खिळ्यांच्या वेदनातून मुक्त करण्यासाठी रस्त्यावर उतरले.
- 9 / 10
शहराभरात हा उपक्रम राबवण्यात आला. महत्त्वाचं म्हणजे नागरिकांनीही या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
- 10 / 10
'खिळेमुक्त झाडाचं कोल्हापूर' या उपक्रमात राज्याचे मंत्री सतेज पाटील आणि आमदारही सहभागी झाले. पण, महत्त्वाचं म्हणजे कोल्हापुरकरांनी सगळ्यांसाठीच वेगळा आणि पर्यावरणपुरक आदर्श उपक्रम ठेवला. (छायाचित्रं सौजन्य/सतेज पाटील, ट्विटर हॅण्डल)