Photos: खुर्चांखाली लपलेले नेते, हिंसक आंदोलक अन् आरडाओरड… अमेरिकन संसदेतील थरार
- 1 / 15
राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव झाल्याने त्यांच्या समर्थकांनी धुडगूस घालत हिंसाचार केला आहे.
- 2 / 15
ट्रम्प यांचे समर्थक वॉशिंग्टनमधील कॅपिटॉल इमारतीत घुसले आणि तोडफोड करण्यास सुरुवात केली. यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. यामध्ये एका आंदोलनकर्त्याचा मृत्यू झाला आहे.लोकशाहीला काळीमा फासणाऱ्या या घटनेचा जगभरातील नेत्यांकडून निषेध केला जात आहे.
- 3 / 15
पोलीस आणि आंदोलकांमध्ये जवळपास चार तास झटापट सुरु होती. भारतीय वेळेनुसार पहाटे चार वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत पुन्हा एकदा कॅपिटॉल इमारतीभोवती सुरक्षाव्यवस्था सुरळीत केली. पोलीसांना ट्रम्प समर्थकांना हटवण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागल्याचं चित्र दिसलं.
- 4 / 15
जो बायडन यांच्या विजयावर शिक्कामोर्तब करण्यासाठी अमेरिकन काँग्रेसची बैठक सुरु असतानाच ट्रम्प यांचे समर्थक इमारतीबाहेर उपस्थित होते. भाषण सुरु असतानाच यापैकी अनेक समर्थक थेट संसदेच्या इमारतीमध्ये शिरले.
- 5 / 15
इमारतीजवळ मोठ्या प्रमाणात सुरक्षा असतानाही ट्रम्प समर्थक कर्फ्यूचं उल्लंघन करत मोठ्या प्रमाणात इमारतीबाहेर जमले होते. बैठक सुरु असतानाच आंदोलकांनी धुडगूस घालण्यास सुरुवात केली आणि इमारतीत प्रवेश केला.
- 6 / 15
यावेळी पोलिसांनी आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला. दरम्यान पोलिसांसोबत झालेल्या झटापटीत एका महिला आंदोलकाचा मृत्यू झाला असल्याचं वृत्त एएफपीने दिलं आहे. महिलेच्या खांद्याला गोळी लागली होती अशी माहिती सीएनएनने दिली आहे.
- 7 / 15
ट्रम्प यांच्या अनेक समर्थकांनी अशाप्रकारे थेट वॉशिंग्टनमधील कॅपिटॉल इमारतीमध्ये घुसखोरी केली.
- 8 / 15
हजारोच्या संख्येने ट्रम्प समर्थक कॅपिटॉल इमारतीबाहेर उपस्थित असल्याने तितक्याच मोठ्या प्रमाणात सुरक्षा यंत्रणांनी फौजफाटा तैनात केला होता. तरीही आंदोलकांनी घुसखोरी केली.
- 9 / 15
आंदोलकांनी इमारतीमध्ये प्रवेश केल्याची माहिती मिळताच कॅपिटॉल इमारतीतील कॅपिटॉल पोलिसांनी अशाप्रकारे मुख्य सभागृहाच्या प्रवेशद्वारांचा ताबा घेतला.
- 10 / 15
मुख्य सभागृहाच्या सर्वच प्रवेशद्वारांबाहेर सुरक्षारक्षक उभे होते. मात्र आंदोलकांची संख्या जास्त असल्याने त्यांना बाहेर काढताना हिंसा झाल्याचे पहायला मिळालं.
- 11 / 15
आंदोलकांची घोषणाबाजी, आरडाओरड, गोंधळ आणि सुरक्षा अधिकाऱ्यांची धावपळ पाहून सिनेटमधील अनेक सदस्यांनी अशाप्रकारे आपल्या आसनांचा आधार घेतला.
- 12 / 15
आंदोलकांनी कॅपिटॉल इमारतीमधील मुख्य सभागृहात प्रवेश मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी तो हाणून पाडला.
- 13 / 15
सभागृहाच्या स्पीकर नॅसी पेलोसी आणि उप राष्ट्राध्यक्ष माईक पेन्सी हे दोघे संयुक्त अधिवेशनाला सुरुवात होण्याआधी चर्चा करताना.
- 14 / 15
सध्या या घुसखोरीसंदर्भात जगभरातून चिंता व्यक्त केली जात असून संत्तांतर हे अशाप्रकारे हिंसक असू नये अशी भावना अनेकांनी व्यक्त केली आहे. तर तिकडे कॅपिटॉल इमारतीबाहेर अजूनही हजारो समर्थकांनी गर्दी केलेली आहे.
- 15 / 15
घडलेल्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता सुरक्षा यंत्रणांनी कॅपिटॉल इमारतीबाहेरील सुरक्षा आणखीन वाढवली आहे. (सर्व फोट एपीवरुन साभार)