“मोदींनी कधीतरी…”; सुटाबुटात सायकल चालवत ऑफिसला गेलेल्या रॉबर्ट वढेरांचा टोला
- 1 / 5
देशातील इंधन दरवाढीविरोधात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ड वढेरा यांनी रस्त्यावर उतरत अनोख्या पद्धतीने आपला निषेध नोंदवला आहे. (फोटो सौजन्य: एएनआय)
- 2 / 5
सोमवारी रॉबर्ट वढेरा यांनी दिल्लीतील खान मार्केट ते कार्यालय हा प्रवास सायकलने करत इंधन दरवाढीला विरोध केलाय. (फोटो सौजन्य: एएनआय)
- 3 / 5
वढेरा हे सूट-बूट घालून सायकल चालवतच आपल्या ऑफिसला पोहचले. त्यांनी अगदी हेल्मेट, मास्क घालून सायकलने आपलं घर ते ऑफिस असा प्रवास केला. (फोटो सौजन्य: एएनआय)
- 4 / 5
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कधीतरी एसी गाड्यांच्या बाहेर पडून इंधन दरवाढीमुळे सामान्यांना कसा त्रास सहन करावा लागोय हे पहावे, असा सल्ला वढेरा यांनी दिला आहे. तसेच असं केल्यानंतर तरी मोदी इंधनाचे दर कमी करतील अशी अपेक्षा वढेरा यांनी व्यक्त केलीय. (फोटो सौजन्य: एएनआय)
- 5 / 5
पंतप्रधान मोदींनी सर्वच गोष्टींसाठी इतरांना (मागील सरकारला) दोष दिलाय, असा टोलाही वढेरा यांनी लगावला आहे. (फोटो सौजन्य: एएनआय आणि ट्विटरवरुन)