हे ढग नाही… युमनेचं पात्र आहे; फोटो बघून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल
- 1 / 5
नदी म्हटलं की डोळ्यासमोर उभं राहत भलं मोठं पात्र. त्यात तळ दिसेल असं नितळशार पाणी. ओंजळीत घेऊन प्यावं इतकं शुद्ध. एक दोन दशकांपूर्वी गाव- शहराजवळून जाणाऱ्या नदीचं असं दृश्य दिसणं म्हणजे नवलाची गोष्ट नव्हती. पण, आता असं दृश्य दुर्मिळ झालं आहे. (Express photo by Abhinav Saha)
- 2 / 5
वाढत्या औद्योगिकीकरणामुळे नद्यांना नाल्याचं स्वरूप आल्याचंच चित्र आहे. त्यामुळे नद्यांचं आरोग्य बिघडलं असून, जलप्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. (Photo/ANI)
- 3 / 5
युमनेच्या पात्रातील पाण्याचे हे फोटो बघितल्यानंतर जलप्रदूषणाची पातळी किती वाढली आहे, हेच दिसून येतं. (Photo/ANI)
- 4 / 5
दिल्लीच्या जवळीन जाणाऱ्या यमुनेचं पाणी लॉकडाउनच्या काळात काही प्रमाणात चांगलं झालं होतं. मात्र, लॉकडाउन शिथिल होताच, पुर्वीचं दृश्य नदीपात्राकडे बघितल्यानंतर दिसत आहे. (Photo/ANI)
- 5 / 5
यमुनेच्या विस्तीर्ण पात्रात सगळीकडे असे विषारी फेस दिसत आहे. दुरून बघितल्यानंतर हा फेस ढग असल्यासारखंच दिसत आहे. (Photo/ANI)