Photos: पुणे शहरात ढगांच्या गडगडाटासहीत मुसळधार पाऊस
- 1 / 5
पुणे शहर आणि परिसरामध्ये आज (२२ मार्च २०२१) दुपारी साडेतीनच्या सुमारास मुसळधार पावसाला सुरुवात झाली. पूर्वमोसमी पावसासंदर्भात यापूर्वीच इशारा देण्यात आला होता. (सर्व फोटो: सागर कासार, लोकसत्ता डॉटकॉम)
- 2 / 5
पुण्यामध्ये साडेतीनच्या सुमारास ढगांच्या कडकडाटासहीत पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. अचानक आलेल्या या जोरदार पावसामुळे सर्वसामान्यांची तारांबळ उडाली.
- 3 / 5
राज्यावर हवेची चक्रीय स्थिती निर्माण होऊन बाष्प येत असल्याने सध्या पूर्वमोसमी पावसाला पोषक स्थिती निर्माण झाली आहे. पुढील चार दिवस सर्वच विभागांत कमी-अधिक प्रमाणात पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आलीय.
- 4 / 5
मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह गारपीट होण्याचा इशारा देण्यात आला असून, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातही काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
- 5 / 5
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार १९ ते २२ मार्च या कालावधीत औरंगाबाद, जालना, परभणी, पुणे, नगर, धुळे, नंदुरबार, जळगाव, बीड, हिंगोली, नागपूर, अकोला, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, वर्धा, बुलढाणा, २१ आणि २२ मार्चला रायगड, रत्नागिरीर्, सिंधुदुर्ग, नाशिक, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर आदी जिल्ह््यांमध्ये काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे.