पुण्यात पोलिसांकडून ‘रस्ते बंद’च पाऊल!
- 1 / 7
महाराष्ट्रातील अनेक शहरांप्रमाणे पुण्यात करोनाचं थैमान सुरू आहे. संक्रमणाचा भांबावून टाकणारा वेग आणि दररोज होत असलेली विस्फोटक रुग्णवाढ यामुळे पुण्यात संचारबंदीसह मिनी लॉकडाउन लावण्यात आलेला आहे. मिनी लॉकडाउनच्या काळात पोलिसांकडून नियमांची कडक अंमलबजावणी केली जात आहे.
- 2 / 7
रात्रीच्या वेळी संचारबंदीच्या काळात नागरिक रस्त्यावर येणार नाहीत, याची खबरदारी घेणाऱ्या पोलिसांनी आता दिवसांही कडक उपाययोजना सुरू केल्या आहेत.
- 3 / 7
पुण्यातील रस्त्यांवरची वर्दळ थांबवण्यासाठी आणि सार्वजनिक ठिकाणीची गर्दी कमी करण्यासाठी ठिकठिकाणी रस्ते बंद करण्यात आले आहेत.
- 4 / 7
पुण्यातील सातारा रोडवरील अहिल्यादेवी चौकात अशा पद्धतीने पोलिसांनी वाहतुकीला ब्रेक लावण्यासाठी बांबू बांधले आहेत.
- 5 / 7
त्याचबरोबर ठिकठिकाणी बॅरिकेट्सही लावण्यात आले आहेत.
- 6 / 7
मिनी लॉकडाउन आणि संचारबंदीच्या काळात कमी कमीत गर्दी होईल यासाठी जिल्हा प्रशासनाबरोबरच पोलिसांकडूनही परिश्रम घेतले जात आहेत.
- 7 / 7
(सर्व फोटो - पवन खेंगरे, इंडियन एक्सप्रेस)