
गेल्या काही दिवसांत देशभरात थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. बर्फाळ प्रदेशांमध्ये बर्फवृष्टीही होत आहे.
मात्र तरीही करोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम नेटाने सुरू असल्याचं दिसून येत आहे.
प्रचंड थंडी, बर्फवृष्टी, बर्फाने भरलेल्या रस्त्यांमधून मार्ग काढत आरोग्य कर्मचारी अगदी छोट्या छोट्या खेड्यांमध्ये जाऊनही लसीकरण करत आहे.
बर्फवृष्टी दरम्यान, जम्मू काश्मीरच्या आरोग्य विभागाने शनिवारी बारामुल्लाच्या बोनियार येथे नियंत्रण रेषेजवळ असलेल्या अनेक गावांमध्ये लसीकरण मोहीम राबवली.
ब्लॉक मेडिकल ऑफिसर डॉ परवेझ मसूदी म्हणाले, “१५-१८ वयोगटातील मुले आणि बूस्टर डोससाठी पात्र असलेल्यांना लसमात्रा देण्यात आल्या.
भारतीय लष्कराने बारामुल्ला येथील बोनियार येथे नियंत्रण रेषेजवळील भागात लसीकरण मोहीम राबविणाऱ्या आरोग्य पथकांना मदत पुरवली.
आम्ही मोठ्या संख्येने लोकांना लसीकरण केले, जे केवळ लष्कराच्या पाठिंब्यामुळे शक्य झाले, असं ब्लॉक वैद्यकीय अधिकारी डॉ परवेझ मसूदी यांनी सांगितलं. (सर्व फोटो सौजन्य – ANI)