
देशाच्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून श्री क्षेत्र पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेला तिरंगी फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे.
झेंडू, शेवंती व कामिनी या फुलांनी श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचा गाभारा सजवण्यात आला आहे.
पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती विविध सण, उत्सव, स्वातंत्र दिन अशा महत्त्वाच्या दिवशी देवाला विशेषरित्या सजवण्यात येते.
या पार्श्वभूमीवर आज ७३ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त श्री विठ्ठल मंदिर सजवण्यात आले आहे.
तिरंगी फुलांची आरास तसेच कामन करण्यात आली आहे. पुणे येथील देवाचे भाविक सचिन चव्हाण, संदीप पोकळे, राहुल पोकळे, संतोष पोकळे, भोलेश्वर पोकळे, आणि विक्रम गुरु यांनी ही सजावट केलीय.
संपूर्ण गाभारा हा फारच आकर्षक दिसत आहे. गाभारा आणि सर्व सजावट करण्यासाठी ७५० किलो फुलांचा वापर करण्यात आलाय.
या सोबत देवाच्या आणि रुक्मिणी मातेच्या अंगावर आज तिरंगी उपरणे देखील घालण्यात आले आहे.
या सजावटीबरोबरच पारंपरिक पोषाख आणि दागिन्यांमध्ये देवाचे रूप अधिक खुलून दिसत आहे.
विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील तिरंगी सजावटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत. (सर्व फोटो : PandharpurVR ट्विटर वरुन साभार)