• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राज ठाकरे
  • बच्चू कडू
  • QUIZ-बिहार निवडणूक
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. valentine week special for rose growers demand for pune flowers at good rates across the country abn 97 kjp

Photos : यंदाचा ‘व्हॅलेंटाइन वीक’ गुलाब उत्पादक शेतकऱ्यांसाठी खास; पुण्यातील फुलांना देशभरातून चढ्या दराने मागणी

पुण्याच्या मावळमधील गुलाब दरवर्षी परदेशात पाठवला जातो.

February 7, 2022 11:59 IST
Follow Us
  • प्रत्येक वर्षी १४ फेब्रुवारीला जगभरात व्हॅलेंटाइन डे साजरा केला जातो. ७ फेब्रुवारीपासून व्हॅलेंटाइन वीक साजरा करण्यास सुरुवात होते.
    1/15

    प्रत्येक वर्षी १४ फेब्रुवारीला जगभरात व्हॅलेंटाइन डे साजरा केला जातो. ७ फेब्रुवारीपासून व्हॅलेंटाइन वीक साजरा करण्यास सुरुवात होते.

  • 2/15

    ७ फेब्रुवारी हा दिवस रोझ डे म्हणून साजरा करतात. या दिवशी अनेक प्रेमी आपल्या प्रिय व्यक्तीला गुलाबाचे फुल देऊन आपले प्रेम व्यक्त करतात.

  • 3/15

    गुलाबाच्या फुलाला व्हेंलटाईन डेच्या निमित्त विशेष महत्व आहे. त्यामुळे व्हेंलटाईन डे पर्यंत गुलाबाच्या फुलांना बाजारामध्ये चांगला भाव मिळणार आहे.

  • 4/15

    पुण्याच्या मावळमधील गुलाब दरवर्षी परदेशात पाठवला जातो. यावर्षी मात्र याउलट चित्र असून भारतातील स्थानिक बाजारपेठेत चढ्या दराने गुलाबाच्या फुलाला भाव मिळत आहे.

  • 5/15

    तर १४ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या व्हेंलटाईन डेसाठी देशभरातील स्थानिक बाजारपेठांमध्ये गुलाब फुलांना मागणी असल्याने शेतकऱ्यांना समाधानकारक दर मिळत आहेत. 

  • 6/15

    यामुळे गुलाब उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदी वातावरण आहे.

  • 7/15

    यावर्षी ४० टक्के गुलाब परदेशात तर ६० टक्के हा भारतात विकला जात आहे.

  • 8/15

    हवाई वाहतूक महागल्याने परदेशातील फूल आयातदारांनी भारतीय बाजारपेठेऐवजी आफ्रिकेतील केनिया, इथोपिया या देशातून फुलांची आयात केली आहे.

  • 9/15

    निर्यातीवर परिणाम झाल्याने परदेशामध्ये गुलाबाच्या किमतीमध्ये घट झाली आहे.

  • 10/15

    एका गुलाबाला किमान १५ ते २० रुपये किंमत भारतात मिळत आहे.

  • 11/15

    परदेशात १२ ते १५ रुपयांना गुलाबाच्या फुलांची विक्री होत आहे

  • 12/15

    त्यामुळे यावर्षीचा व्हेंलनटाईन डे गुलाब उत्पादकांसाठी विशेष ठरतोय.

  • 13/15

    तरुण आणि तरुणींना लाल गुलाब आकर्षित करत आहे. तर पांढरा, पिवळा, केशरी हा गुलाब देखील बहुतांश तरुणांना भुरळ घालतोय.

  • 14/15

    गेल्या दोन वर्षांपासून करोनाचा सामना करत गुलाब उत्पादक अनेक संकटातून दिवस काढत आहेत.

  • 15/15

    पण यावर्षी करोनाचा प्रभाव कमी झाल्याने लग्न सोहळे, इतर कार्यक्रमामुळे भारतातील बाजारपेठामध्ये गुलाबाला चांगला भाव मिळाला आहे. (सर्व फोटो- कृष्णा पांचाळ)

Web Title: Valentine week special for rose growers demand for pune flowers at good rates across the country abn 97 kjp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.