
महाराष्ट्र नवनिर्मान सेना आणि सहेली बचत गट मार्फत रवी सहाणे यांनी शेतकरी ते ग्राहक, महाराष्ट्र माझा आंबा महोत्सव बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित केला आहे.

या अंतर्गत आज बच्चे कंपनीसाठी आंबे खा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

उन्हाळ्यात रसदार आंबे खाण्यासाठी बच्चेकंपनीने मोठ्या संख्येने गर्दी केली होती.

तर मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांचे पालक देखील उपस्थित होते.

या स्पर्धेत सहभागी झालेल्या मुलांना सुरुवातीस प्रत्येकी तीन आंबे खाण्यास दिले होते.

आणि तीन मिनिटांत हे आंबे खायचे असे सांगण्यात आले होते.

या स्पर्धेत पलक मालुसरे हिने पहिली क्रमांक पटकवला. तिला एक आंब्याची पेटी भेट देण्यात आली.

घरात बाबा आंबे कधी आणणार याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या बच्चेकंपनीने या स्पर्धेत आंब्यांवर मनसोक्त ताव मारला.

आंबे खाताना संपूर्ण तोंड माखलं तरी देखील मुलं आंबे खाण्यात मग्न होती.

सुरुवातीस देण्यात आलेले तीन आंबे संपल्यानंतर हात वर करून आणखी आंबे मागायचे असे मुलांना सांगण्यात आले होते.

ही अनोखी स्पर्धा पाहताना आणि मुलं ज्या प्रकारे आंब्यांवर तुटून पडली हे पाहून उपस्थितांना हसू अनावर होत होतं.

आंबे खातांना मुलांना अंगावरील कपडे भरतील किंवा आणखी कशाचीही तमा बाळगली नाही.

या स्पर्धेची शहरात जोरदार चर्चा रंगली आहे. स्पर्धेतून मुलांना मनोसक्त आंबे खाण्याचा आनंद घेता आला.

उन्हाळ्यात बच्चे कंपनी आंब्यांची आतुरतेने वाट पाहत असतात. लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांनाच आंबे खायला आवडत असतं.

मुलं मनसोक्त आंबे खात असल्याचे पाहून पालकांना देखील मनस्वी आनंद होत होता.

मुलांचा उत्साह वाढवण्यासाठी पालकवर्ग आणि स्पर्धेचे आयोजक टाळ्या वाजवून त्यांना प्रोत्साहित करत होते.

ही स्पर्धा सुरू असताना उपस्थित नागरिकांनी आपल्या मोबाईलमध्ये मुलांचे आंबे खातानाचे फोटो काढले.

आंबे खा या स्पर्धेत सहभागी झालेल्या मुलांचा उत्साह पाहून मोठ्यांनाही त्यांचे लहानपण आठवले

उन्हाळ्यात बच्चे कंपनी आंब्यांची आतुरतेने वाट पाहत असतात. लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांनाच आंबे खायला आवडत असतं.

मोठ्यांना देखील आंबे खाण्याची मनस्वी इच्छा होत होती परंतु, ही स्पर्धा मुलांसाठी असल्याने त्यांना पाहण्याशिवाय पर्याय नव्हता.