
भारताच्या तिन्ही बाजूला पसरलेल्या अथांग समुद्रावर नजर ठेवण्याची जबाबदारी P-8I या टेहळणी विमानांवर आहे
मुंबईत युद्धनौकांचा जलावतरण कार्यक्रम झाल्यावर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नौदलाच्या P-8I विमानाबरोबर प्रदीर्घ पहाणी दौरा केला (फोटो सौजन्य – Indian Navy)
P-8I विमानाची पहाणी केली, कामाचे स्वरुप जाणून घेतले, नौसेनेच्या अधिकाऱ्यांबरोबर संवाद साधला (फोटो सौजन्य – Indian Navy)
देशाच्या सागरी भागाचे हित P-8I सारख्या विमानांमुळे सुरक्षित असल्याबद्दल राजनाथ सिंह समाधान व्यक्त केले (फोटो सौजन्य – Indian Navy)
देशाला लाभलेले अथांग सागरी क्षेत्र, या भागात मोठ्या प्रमाणात होत असलेली जलवाहतुक, सागरी भागात असलेली नैसर्गिक संपत्ती हे लक्षात या भागाच्या संरक्षणासाठी घेता P-8I विमानांचा समावेश नौदलात करण्यात आला
तंत्रज्ञान हे अमेरिकेचे असले तरी भारताच्या सोईनुसार बदल करत एकुण १२ P-8I टेहळणी विमानांचा नौदलात समावेश करण्यात आला आहे (फोटो सौजन्य – Indian Navy)
तामिळनाडूत INS Rajali आणि गोव्यात INS Hansa या नौदलाच्या हवाई तळांवर ही विमाने तैनात आहेत (फोटो सौजन्य – Indian Navy)
पाण्यावरील जहाजे, पाण्याखाली असलेल्या पाणबुड्या यांच्यावर नजर ठेवण्याची – शोध घेण्याची मुख्य जबाबदारी या विमानांवर आहे
अथांग समुद्रात गस्त घालण्याबरोबर जमिनीवरही टेहेळणीसाठी विमानांचा वापर होतो, डोकलाम प्रकरण आणि पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तान सीमेवरील हालचाल टिपण्यासाठी या विमानांचा वापर करण्यात आला होता
शक्तीशाली रडार, सर्वोत्कृष्ठ संदेशवहन यंत्रणा, वेळ पडल्यास क्षेपणास्त्र-पाणतीर (torpedo) डागण्याची या विमानात क्षमता आहे. सलग सहा तास गस्त घालण्याची, एका दमात ५ हजार किलोमीटरपेक्षा अंतर पार करण्याच्या P-8I च्या क्षमतेमुळे नौदलाचे सामर्थ्य वाढले आहे. (फोटो सौजन्य – wikipedia)