
१५ जूनला गतविजेत्या इंडोनेशियाचा पराभव करून भारताने थॉमस कप २०२२ चे विजेतेपद पटकावले, स्पर्धेच्या ७३ वर्षांच्या इतिहासातील भारताचे पहिलेच जेतेपद ठरले

भारताने पहिले तीन सामने जिंकून १४ वेळच्या चॅम्पियन इंडोनेशियाचा एकतर्फी ३-० असा पराभव केला

ऐतिहासिक थॉमस चषक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीम इंडियाचे फोनवरुन संवाद साधत अभिनंदन केले होते

दरम्यान बँकॉकहून परतलेल्या थॉमस कप विजेत्या संघाने मोदी यांची भेट घेतली

उबेर कपमधील सहभागी महिला सदस्य यांनीही मोदी यांची भेट घेतली

थॉमस कप आणि उबेर कपमधील सहभागी बॅडमिंटपटूंबरोबर पंतप्रधानांनी मोदी यांनी संवाद साधला

मोदी यांनी विजेत्या टीमचे तोंडभरून कौतुक केले आणि पुढील वाटचालीसाछी शुभेच्छा दिल्या

मोदी म्हणाले “मी बॅडमिंटनपटूंना खात्रीपूर्वक सांगतो की सरकार सर्व प्रकारे शक्य होईल ती मदत तुम्हाला करेल. टीममधील सर्वांचे देशवासियांच्या वतीने अभिनंदन करतो”

“या स्पर्धेचे नाव अनेकांना माहितीही नाहीये. तेव्हा तुमचा विजय ही काही छोटी घटना नाहीये” असं पंतप्रधान मोदी म्हणाले

टीममधील सर्व सदस्य चांगले खेळतच होते, माझं लक्ष्य होतं या सर्वांना एकत्र आणणे कारण ही स्पर्धा म्हणजे एका टीमचे एकत्रित कौशल्य होतं अशा भावना श्रीकांत किदम्बीने यावेळी व्यक्त केल्या

लक्ष्य सेनने विजयाचा आनंद म्हणून उत्तराखंडची प्रसिद्ध ‘अल्मोडा बाल मिठाई’ ही मोदी यांना दिली ( सर्व फोटो सौजन्य – ट्विटर )