
‘शून्य सावली दिवस’ ही भौगोलिक घटना लहान-थोरांना अत्यंत कुतूहल निर्माण करणारी आहे.

शून्य सावली दिवस हा शब्दच कुतूहल निर्माण करणारा असून या दिवशी वर्षभर सोबत राहणारी आपली सावली काही मिनिटांसाठी आपल्याला सोडून जाते.

आज नागपूरकरांनी अनुभवला शून्य सावली दिवस.

१२ वाजून १० मिनीटांनी आज शून्य सावली झाली होती.

रामन विज्ञान केंद्रावर शून्य सावली अनुभवायला विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती.

सूर्याचा उत्तरायण आणि दक्षिणायन असा भासमान मार्ग पृथ्वीच्या २३.५० अक्षांश दक्षिण आणि उत्तरेकडे असतो.

म्हणजेच कर्कवृत्त आणि मकरवृत्त ह्या दरम्यान असणाऱ्या सर्व भूभागावर सूर्य वर्षांतून दोनदा दुपारी डोक्यावर येतो आणि दोनदा शून्य सावली दिवस येतात.

सूर्य आणि पृथ्वी ह्यातील कोनीय व्यास आणि अंशात्मक अंतर जिथे जुळते, तिथे शून्य सावली दिवस घडतो.

महाराष्ट्रात ३१ मे पर्यंत शून्य सावली दिवस अनुभवता येणार आहेत. (फोटो सौजन्य : धनंजय खेडकर, लोकसत्ता (नागपूर))