
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा आज ६५ वा वाढदिवस.

नितीन गडकरी यांना वाढदिवसानिमित्त शुभेछा देण्यासाठी वर्धा मार्गावरील त्यांच्या निवासस्थानी सकाळपासून भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती.

सकाळी नऊ नंतर शुभेच्छा देण्यासाठी भाजपा व इतर पक्षांच्या कार्यकर्त्यांची मोठी रीघ लागली होती.

अगदी सर्वसामान्यांपासून ते काँगेस. राष्ट्रवादी काँग्रेससह विविध राजकीय पक्षाचे कार्यकर्तेही गडकरींनी शुभेच्छा देण्यासाठी आले होते.

काहींनी अगदी सहा उंचीचा बुके भेट दिला तर काहींनी फेटा बांधून त्यांचा सत्कार केला.

या निमित्ताने शहरातही भाजपाकडून विविध सामाजिक उपक्रम राबवले जात आहे. (फोटो सौजन्य : धनंजय खेडकर, लोकसत्ता नागपूर)