• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राज ठाकरे
  • बच्चू कडू
  • QUIZ-बिहार निवडणूक
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. hira raja bull will pull the palanquin chariot sant tukaram palkhi rath abn 97 kjp

जगतगुरु संत तुकोबांचा पालखी रथ ओढणार रुबाबदार हिरा- राजा

जगतगुरु संत तुकाराम महाराज पालखी रथ ओढण्याचा मान यावर्षी वाकड येथील शेडगे कुटुंबाच्या बैलजोडीला मिळाला आहे

Updated: May 30, 2022 16:54 IST
Follow Us
  • जगतगुरु संत तुकाराम महाराज पालखी रथ ओढण्याचा मान यावर्षी वाकड येथील शेडगे कुटुंबाच्या बैलजोडीला मिळाला आहे. हिरा-राजा असं पालखी रथ ओढणाऱ्या बैलजोडीच नाव आहे.
    1/12

    जगतगुरु संत तुकाराम महाराज पालखी रथ ओढण्याचा मान यावर्षी वाकड येथील शेडगे कुटुंबाच्या बैलजोडीला मिळाला आहे. हिरा-राजा असं पालखी रथ ओढणाऱ्या बैलजोडीच नाव आहे.

  • 2/12

    अत्यंत रुबाबदार अशी बैलजोडी असून १७ बैलजोड्यांपैकी हिरा- राजा या जोडीची निवड देहू संस्थानने पालखी सोहळ्यासाठी केली आहे. याशिवाय, सागर टिळेकर यांच्या हिरा-मोतीचा देखील समावेश आहे. 

  • 3/12

    जगतगुरु संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा २० जून पासून सुरू होत आहे. पालखी पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे.

  • 4/12

    पालखी रथ ओढण्यासाठी देहू संस्थानने बैलजोडी असलेल्या शेतकऱ्यांचे अर्ज मागविले होते.

  • 5/12

    यासाठी १७ अर्ज देहूसंस्थांकडे प्राप्त झाले, त्यापैकी ज्ञानेश्वर शेडगे यांच्या हिरा-राजाला यावर्षीचा मान मिळाला आहे. यामुळे शेडगे कुटूंबात आनंदाचे वातावरण आहे

  • 6/12

    ज्ञानेश्वर शेडगे हे वारकरी संप्रदायातील असून गेल्या काही वर्षांपासून ते देहू ते पंढरपूर वारी करतात.

  • 7/12

    जगतगुरु संत तुकाराम महाराज यांचा पालखी रथ ओढण्याचा मान बैलजोडीला मिळावा म्हणून शेडगे कुटंबिय तब्बल नऊ बैलांचा सांभाळ करत आहेत.

  • 8/12

    त्यापैकी यावर्षी हिरा-राजा या जोडीला मान मिळाला आहे, असे गिरीश ज्ञानेश्वर शेडगे यांनी सांगितलं आहे.

  • 9/12

    देहू संस्थानचे विश्वास्थ नितीन महाराज मोरे यांनी स्वतः बैल जोडीची पाहणी केली. त्यानंतर या दोन्ही बैलांची निवड एकमताने करण्यात आली. 

  • 10/12

    हिरा-राजा या बैलजोडीला सात वर्षांपूर्वी कर्नाटकमधून आणण्यात आलं होते.

  • 11/12

    त्यांचं संगोपन करून दररोज खुराख खायला दिला जात आहे. याच पद्धतीने ऐकून नऊ बैलांचा सांभाळ शेडगे कुटुंब करत आहे.

  • 12/12

    दरम्यान, दीड वर्षांपूर्वी एका बैलाचा मृत्यू झाल्याचे सांगत असताना ज्ञानेश्वर शेडगे यांना अश्रू अनावर झाले.  (सर्व फोटो – कृष्णा पांचाळ/ लोकसत्ता प्रतिनिधी)

Web Title: Hira raja bull will pull the palanquin chariot sant tukaram palkhi rath abn 97 kjp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.