-
आज देशाचा ७६वा स्वातंत्र्यदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरून ध्वजारोहण करून देशातील जनतेला अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.
-
राष्ट्रगीत झाल्यानंतर लाल किल्ला परिसरात हेलिकॉप्टरच्या मदतीने पुष्पवृष्टी करण्यात आली.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निळ्या रंगाचा कोट आणि तिरंग्याचे रंग असलेला फेटा असा पेहराव केला होता.
-
लाल किल्ल्यावर नरेंद्र मोदी यांच्यासह देशातील महत्त्वाचे नेते आणि परदेशी पाहुणेदेखील उपस्थित आहेत.
-
यावेळी स्वातंत्र्यसैनिक, देशाचे जवान, पोलीस, लोकप्रतिनिधी, सैनिक, स्थानिक स्वराज्य संस्थांचे शासक, प्रशासक यांचे स्मरण करण्यात आले.
-
लाल किल्ल्यावर पोहोचण्याआधी नरेंद्र मोदी यांनी राजघाटावर जाऊन देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळी जाऊन त्यांना अभिवादन केले.
-
भारतीय संरक्षण दलाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींना ‘गार्ड ऑफ ऑनर’ देण्यात आले.
-
ध्वजारोहण झाल्यानंतर मोदींनी लाल किल्ल्यावरून देशातील जनतेला संबोधित केले.
-
देशाच्या स्वातंत्र्याला १०० वर्षे पूर्ण होतील तेव्हा भारत विकसित होण्याच्या दृष्टीने युवकांना योगदान देण्याचे आवाहन मोदींनी केले.
-
मोदींनी भाषणातून एकता आणि एकजुटीचा संदेशही दिला. महिलांचा अपमान न करण्याचा संकल्प करुया, असेही मोदी म्हणाले.
-
अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ‘हर घर तिरंगा’ मोहीम राबविण्यात आली. या माध्यमातून लोकांमध्ये चेतना निर्माण झाल्याचं मोदींनी सांगितले.
-
‘जय हिंद’, ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम’च्या जयघोषात लाल किल्ल्याचा परिसर दुमदुमला होता.
-
(सर्व फोटो : ANI )

Ladki Bahin : लाडकी बहीण योजनेबाबत देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य, “ज्या महिला अपात्र ठरल्या आहेत त्यांना मिळालेला निधी…”