-
प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी आज महाराष्ट्रातील नागपूरमध्ये वेगवेगळ्या प्रकल्पांच्या लोकार्पण सोहळ्यासाठी, पायाभरणीच्या कार्यक्रमांना हजेरी लावली. आजच्या एका दिवसाच्या दौऱ्यामध्ये मोदींनी ७५ हजार कोटींच्या प्रकल्पांच्या उद्घाटन तसेच पायाभरणी कार्यक्रमांना हजेरी लावली. (सर्व फोटो ट्वीटरवरुन साभार)
-
सकाळी साडेनऊच्या सुमारास पंतप्रधान मोदी नागपूर विमानतळावर दाखल झाले. त्यांच्या स्वागतासाठी राज्यपाल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीही उपस्थित होते.
-
राज्यपाल भगसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींबरोबर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेही विमानतळावर हजर होते.
-
सकाळी साडेनऊ वाजता पंतप्रधानांचे नागपूर विमानतळावर आगमन झाले. तेथून ते थेट रल्वे स्थानकावर गेले.
-
मोदींनी नागपूर- बिलासपूर वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला. मध्य भारतातील ही पहिली वंदे भारत एक्सप्रेस आहे.
-
मोदींनी या ट्रेनने प्रवास करणाऱ्या प्रवाशांबरोबर ट्रेनमध्ये जाऊन चर्चा केली. या एक्सप्रेस गाडीच्या माध्यमातून महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर आणि छत्तीसगडची राजधानी रायपूर आणि बिलासपूर ही महत्वाची शहरं जोडली जाणार आहेत.
-
मोदींनी या रेल्वेच्या मोटरमन्सकडूनही रेल्वेसंदर्भातील माहिती घेतली. प्रवासी घेणार वेगवान व सुरक्षित प्रवासाचा अनुभव. विमान प्रवासाची प्रचिती घेतानाच ‘कवच’ या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून या एक्सप्रेस गाडीत सर्वोत्तम सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे.
-
यावेळेस मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी खास चित्र पंतप्रधान मोदींना भेट म्हणून दिलं.
-
रेल्वेस्थानकावरील कार्यक्रम आटोपून मोदी थेट मेट्रोच्या झिरो माईल स्थानकावर आले. तेथून त्यांनी खापरी मेट्रोस्थानकापर्यंत मेट्रोतून प्रवास केला.
-
पंतप्रधानांच्या हस्ते नागपूर मेट्रोच्या कस्तूरचंद पार्क ते ऑटोमोटिव्ह चौक आणि बर्डी ते प्रजापती नगर या दोन नव्या मार्गिकेचे उद्गघाटन झाले.
-
या दरम्यान त्यांनी रितसर तिकीट खरेदी केले होते.
-
मोदींचे नागपूर मेट्रो स्थानकामधील तिकीट खरेदी करतानाचे फोटोही सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत.
-
खापरी स्थानकावर मेट्रो टप्पा-१् चे लोकार्पण, मेट्रो -२् चे भूमिपूजन केले.
-
यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि नागपूरचे तसेच महाराष्ट्र भाजपाचे सर्वात प्रमुख नेते देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते.
-
मोदींनी या मेट्रो प्रकल्पांची माहिती अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली.
-
काही दिव्यांग प्रवाशांशी मोदींनी संवाद साधताना ही मेट्रो सर्वांच्या दृष्टीने सोयीस्कर असल्यासंदर्भात चर्चा केली.
-
पंतप्रधानांनी मेट्रो प्रवासात विद्यार्थिनींशी संवाद साधला.
-
मेट्रोच्या कर्मचाऱ्यांबरोबरही मोदींनी या प्रवासादरम्यान चर्चा केली.
-
मोदींनी मेट्रोमध्ये अधिकाऱ्यांशी वेगवेगळ्या विषयांवर चर्चा केली.
-
मोदींचे मेट्रो प्रवासातील हे फोटो खुद्द मोदींबरोबरच मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी पोस्ट केले आहेत.
-
नागपूर मेट्रो आणि समृद्धी एक्सप्रेस हायवेच्या लोकार्पण सोहळ्यानंतर पंतप्रधानांच्या हस्ते एम्स नागपूरचे राष्ट्रार्पणही करण्यात आलं.
-
मोदींनी एम्स प्रकल्प नेमका कसा आहे, त्याचा कोणाला आणि किती फायदा होणार यासारखी माहिती अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली.
-
एम्स नागपूरमुळे शहर आणि परिसरातील , विशेषतः दुर्गम आदिवासी भागातील आरोग्यविषयक पायाभूत सुविधा मजबूत होतील. आज एम्सचे उदघाटन करतांना मला विशेष आनंद होत आहे, या मराठी कॅप्शनसहीत मोदींनी या उद्घाटन सोहळ्याचे फोटो शेअर केले आहेत.
-
मोदींच्या हस्ते नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या शिर्डीपर्यंतच्या ५२० किलोमीटर टप्प्याचे लोकार्पण करण्यात आलं.
-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर मोदींनी या महामार्गाची पहाणी केली.
-
तेथे मोदींच्या स्वागतासाठी ढोलपथक तैनात होतं. या ढोल पथकामधील तरुणांचा उत्साह आणि वादन पाहून मोदींनीही ढोलवादन केलं. या ढोल-ताशा पथकातील एका तरुणाजवळ जात मोदींनी स्वत: ढोलवादन केलं.
-
मोदींचा हा ढोल वाजवतानाचा व्हिडीओ पंतप्रधान कार्यालयाच्या ट्वीटर हॅण्डलवरुन पोस्ट करण्यात आला आहे.
-
याच महामार्गावरुन पंतप्रधान मोदींच्या ताफ्याने एक फेरफटकाही मारला.

Chhaava : ‘छावा’ची ग्रँड ओपनिंग! विकी कौशलच्या सिनेमाने पहिल्या दिवशी कमावले ‘इतके’ कोटी