-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नव्या संसद भवनाचे उद्घाटन झाले. यावेळी सत्तेचे हस्तांतरण करण्याचे प्रतिक असलेल्या सेंगोल हा भारताचा ऐतिहासिक राजदंडही सभागृहात स्थापित करण्यात आला. (फोटो – भाजपा ट्विटर)
-
या सेंगोलला ऐतिहासिक आणि पौराणिक संदर्भ असल्याने तामिळनाडूतील विद्वानांच्या हस्ते ते सभागृहात आणण्यात आले. (फोटो – भाजपा ट्विटर)
-
हेच ते संसदेतील लोकसभेचे भव्य सभागृह असून येथे ८८८ खासदार बसू शकतील एवढी आसनव्यवस्था आहे. येत्या काळात खासदारांची संख्या वाढणार असल्याने येथील आसनांची संख्याही वाढवली असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी दिली. (फोटो – भाजपा ट्विटर)
-
नव्या संसद भवनाच्या उद्घाटनावेळी तामिळनाडूहून आलेल्या विद्वनांसमोर नतमस्तक होऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आशीर्वाद घेतले. (फोटो – भाजपा ट्विटर)
-
“आजपासून २५ वर्षांनंतर भारत स्वातंत्र्याचे १०० वर्षे पूर्ण करणार आहे. आमच्याकडेही २५ वर्षांचा अमृत कालखंड आहे. या २५ वर्षांत आपल्याला एकत्र येऊन भारताला विकसित राष्ट्र बनवायचं आहे”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला संबोधित करताना म्हटलं. (फोटो – भाजपा ट्विटर)
-
“यशस्वी होण्याची पहिली अट म्हणजे यशस्वी होण्यावर विश्वास ठेवणे हीच असते. हे नवे संसद भवन या विश्वासाला नवी उंची देणार आहे. विकसित भारताच्या निर्माणात हे नवे संसद भवन आपल्या प्रत्येकासाठी प्रेरणा बनेल. प्रत्येक भारतीयातील कर्तव्य भावनेला हे संसद जागृत करेल”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. (फोटो – भाजपा ट्विटर)
-
संसदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘सेंगोल’समोर नतमस्तक झाले. (फोटो – भाजपा ट्विटर)
-
या संसदेच्या निर्माणात ज्या कामगारांनी योगदान दिले त्यांचेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आभार मानले. त्यांनी या नव्या इमारतीसाठी आपला घाम गाळला आहे. त्यांच्या श्रमाला समर्पित एक डिजिटल गॅलरीही बनवण्यात आली आहे, असंही मोदींनी यावेळी स्पष्ट केलं. (फोटो – नरेंद्र मोदी ट्विटर)
-
नव्या संसद भवनाचं उद्घाटन होण्यापूर्वी तामिळनाडूच्या अधिनम संतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेत, संगोल सुपूर्द केलं होतं. सेंगोल राजदंड ज्यांच्याकडं सुपूर्द करण्यात येतं, त्यांच्याकडून न्यायाची आणि निष्पक्षपाती सरकारची अपेक्षा केली जाते, असं सांगितलं जातं. (फोटो – नरेंद्र मोदी ट्विटर)
-
“एकविसाव्या शतकातील नवा भारत गुलामगिरीचा विचार मागे टाकून आपले प्राचीन वैभव झपाट्याने परत मिळवत आहे. संसदेची नवीन इमारत हे त्याचे जिवंत प्रतीक आहे”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.(फोटो – नरेंद्र मोदी ट्विटर)
-
आजच्या कार्यक्रमाचे औचित्य साधत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टपाल तिकिट आणि ७५ रुपयांच्या नाण्याचे अनावरण केले. आजचा दिवस प्रत्येकाच्या स्मरणात राहावा याकरता ७५ रुपयांच्या नाण्याचे अनावरण करण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. (फोटो – निर्मला सीतारामण ट्विटर)

जळगावमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये नथुराम गोडसेचा फोटो घेऊन नाचण्याची घटना, मंत्री गिरीश महाजन म्हणाले…