-
नवसाला पावणारा राजा अशी ख्यात असलेल्या लालबागच्या राजाचे आज, ७ जून रोजी गणेश मुहूर्त पूजन संपन्न झाले. (सर्व फोटो – लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ / फेसबूक)
-
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे लालबागच्या राजाचे ९० व्या वर्षाचे गणेश मुहूर्त पूजन संकष्ट चतुर्थी बुधवार ७ जून रोजी सकाळी ६ वाजता मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे व मूर्तिकार कांबळी आर्ट्सचे रत्नाकर मधुसूदन कांबळी यांच्या शुभहस्ते मूर्तिकार कांबळी आर्ट्सच्या चित्रशाळेत पार पडले. यावेळी खजिनदार मंगेश दत्ताराम दळवी यांनी पावती पुस्तकाचे पूजन केले.
-
हिंदू दिनदर्शिकेनुसार यंदा २०२३ मध्ये बाप्पा सप्टेंबरच्या मध्यात आपल्या घरी येतील. १९ सप्टेंबरला बाप्पाचे आगामन होईल तर २९ सप्टेंबरला अनंत चतुर्दशी असेल. त्यामुळे गेल्यावर्षीपेक्षा यंदा बाप्पाच्या आगमनासाठी भाविकांना २० दिवस जास्त वाट पाहावी लागणार आहे.
-
मुंबईतील सर्वांत प्रसिद्ध असलेल्या लालबागच्या राजाची मूर्ती बनवण्याचे काम लवकर सुरू होते. या काळात संपूर्ण लालबाग सजलेले असते. या सजावटीचेही काम आता सुरू होण्याची शक्यता आहे. दहा दिवस बाप्पाची मनोभावे सेवा करता यावी याकरता दोन-तीन महिन्याआधीपासूनच जय्यत तयारी सुरू झालेली असते.
-
आज, ७ जून रोजी मुहूर्त पूजन संपन्न झाले आहे. बाप्पाची मूर्ती बनवून तयार झाल्यानंतर गणेश चतुर्थीच्या आदल्यादिवशी प्रथम दर्शन केले जाते. मग, नियमित दर्शनासाठी रांग सुरू होते.
-
दरवर्षी बाप्पाच्या दर्शनासाठी देशभरातून नागरिक लालबाग नगरीत येत असतात.
-
कोरोना काळात लालबागचा राजा मंडळाने पुढाकार घेऊन गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा केला होता. या काळात त्यांनी रक्तदान, प्लाझ्मादान सारखे लोकपयोगी समाजहिताचे उपक्रम राबवले होते. याचा परिणाम म्हणून मुंबईतील इतर मंडळांनीही लालबागचा राजा मंडळाचे आदर्श घेऊन समाजपयोगी उपक्रम राबवले.
-

“जेव्हा पक्ष सांगेल, तुझी गरज नाही आता…”, देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान