-
बहुप्रतिक्षित अयोध्येतील राम मंदिरात श्रीराम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा विधीवत कार्यक्रम पार पडला.
-
या कार्यक्रमानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी यापुढे राम तंबूत नाही तर मंदिरात राहणार असल्याचा पुनरुच्चार केला.
-
आज या ऐतिहासिक काळात देश त्या व्यक्तिमत्त्वांचे स्मरण करत आहे, ज्यांच्या कार्य आणि समर्पणामुळे हा शुभ दिवस आपण पाहत आहोत. रामाच्या या कार्यात अनेकांनी त्याग केला आहे. त्या अगणित राम भक्तांचे, त्या अगणित करसेवकांचे आणि त्या अगणित संत-महात्मांचे आपण सर्व ऋणी आहोत, असं नरेंद्र मोदी म्हणाले.
-
राम अग्नी नाही, राम ऊर्जा आहे. राम हा वाद नाही, राम हा उपाय आहे. राम फक्त आमचा नाही, राम सर्वांचा आहे, असंही मोदी यावेळी म्हणाले.
-
आजपासून या पवित्र काळापासून आपल्याला पुढील १००० वर्षांसाठी भारताची पायाभरणी करायची आहे. मंदिराच्या उभारणीपासून पुढे जाताना आपण सर्व देशवासी या क्षणापासून एक मजबूत, सक्षम, भव्य, दिव्य भारत घडवण्याची शपथ घेतो.
-
काळाचे चक्र बदलत असल्याचे आज मला शुद्ध अंतःकरणाने वाटते. कालातीत मार्गाचे शिल्पकार म्हणून आमच्या पिढीची निवड झाली हा एक सुखद योगायोग आहे. हजार वर्षांनंतरची पिढी आपले आजचे राष्ट्र निर्माण कार्य लक्षात ठेवेल.
-
हे भव्य राम मंदिर भारताच्या प्रगतीचे, भारताच्या उदयाचे साक्षीदार बनेल. हे भव्य राम मंदिर भव्य भारत, विकसित भारताच्या उदयाचे साक्षीदार बनेल.
-
राज्यघटना अस्तित्वात आल्यानंतरही भगवान श्रीरामाच्या अस्तित्वावरून अनेक दशके कायदेशीर लढाई सुरूच होती. न्यायाची प्रतिष्ठा जपणाऱ्या भारतीय न्यायव्यवस्थेबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करू इच्छितो. प्रभू श्री रामाचे मंदिरही सनदशीर पद्धतीने बांधले गेले.
-
हे मंदिर केवळ देवाचे मंदिर नाही. भारताच्या दृष्टीचे, भारताच्या तत्त्वज्ञानाचे, भारताच्या दिशेचे हे मंदिर आहे. हे रामाच्या रूपातील राष्ट्रीय चेतनेचे मंदिर आहे. राम हा भारताचा विश्वास आहे, राम हा भारताचा पाया आहे. राम हा भारताचा विचार आहे, राम हा भारताचा कायदा आहे. राम हे भारताचे चैतन्य आहे, राम हे भारताचे विचार आहे. राम ही भारताची प्रतिष्ठा आहे.
-
एक काळ असाही होता जेव्हा काही लोक म्हणायचे की राम मंदिर बांधले तर आग लागेल. रामललाच्या या मंदिराचे बांधकाम भारतीय समाजाच्या शांतता, संयम, परस्पर सौहार्द आणि समन्वयाचे प्रतीक आहे. हे बांधकाम अग्नीला जन्म देत नाही तर ऊर्जेला जन्म देत आहे.
-
तुमच्यासमोर हजारो वर्षांच्या परंपरेची प्रेरणा आहे, तुम्ही चंद्रावर तिरंगा फडकवणाऱ्या भारताच्या पिढीचे प्रतिनिधित्व करता.
-
दरम्यान नरेंद्र मोदी यांनी प्राणप्रतिष्ठेनंतर अनेक साधू-संतांची भेट घेतली.
-
आपल्या अनेक पिढ्यांनी जे धैर्य दाखवलं त्या धैर्याचा वारसा आज आपल्याला मिळाला आहे. गुलामीची मानसिकता तोडून आपण नवराष्ट्र निर्मिती करतो आहोत. अशाच प्रकारे नवा इतिहास लिहिला जातो. आजपासून एक हजार वर्षांनीही आजचीही तारीख लक्षात ठेवतील. ही रामाचीच कृपा आहे. आज आपण सगळे हा क्षण आपण जगतो आहोत, आपण पाहतो आहोत.
-
आजचा दिवस, दिशा सगळं काही दिव्य झालं आहे. ही वेळ सामान्य नाही. कालचक्रावर केलेली स्मृतीची अमिट स्मृती आहे. आपल्याला सगळ्यांन ठाऊक आहे की रामाचं काम जिथे असतं तिथे पवनपुत्र हनुमानही विराजमान असतात. मी आज रामभक्त आणि हनुमानगढीलाही प्रणाम करतो.
-
माता जानकी, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न या सगळ्यांनाही मी नमन करतो. मी दिव्य चेतना आपल्या शेजारी आहेत असं वाटतं आहे मी त्यांनाही नमन करतो आहे. आज मी प्रभू रामाची माफीही मागतो आहे. आमचा पुरुषार्थ, त्याग आणि तपस्येत काहीतरी कमतरता राहिली असेल. त्यामुळेच आपण इतकी युगं हे करु शकलो नाही. आज ती कमतरता आपण भरुन काढली आहे. मला विश्वास आहे की प्रभू राम आज आपल्याला माफ करतील.

IND vs ENG: “इंग्लंडच्या गोलंदाजांनी माझ्या शरीराच्या दिशेने…”, रोहित शर्माचं शतकाबाबत मोठं वक्तव्य; भारताच्या विजयानंतर काय म्हणाला?