-

बुधवारी (२४ जुलै) सकाळी काठमांडू येथील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण करताना सौर्य एअरलाइन्सचे विमान धावपट्टीवरून घसरल्याने झालेल्या अपघातात १८ जणांचा मृत्यू झाला. (पीटीआय फोटो)
-
विमानतळ सुरक्षा प्रमुख अर्जुन चंद ठाकुरी यांनी रॉयटर्स वृत्तसंस्थेला सांगितले की, विमान दोन क्रू मेंबर्स आणि १७ तंत्रज्ञांना पोखरा शहरात देखभाल तपासणीसाठी घेऊन जात होते. (पीटीआय फोटो)
-
पायलट मनीष शांक्य यांच्या डोळ्यांना दुखापत झाली असली तरी त्यांच्या जीवाला कोणताही धोका नाही, असे काठमांडू वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले, तिथे पायलटवर उपचार सुरू आहेत. दरम्याम, नेपाळ लष्कराच्या नेतृत्वात बचावकार्य केले गेले. (पीटीआय फोटो)
-
मृतदेह शवविच्छेदनासाठी काठमांडू येथील टीयू टीचिंग हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहेत. (पीटीआय फोटो)
-
काठमांडू पोस्टने प्रत्यक्षदर्शींच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, टेक ऑफ करताना पंखांचे टोक जमिनीवर आदळल्यानंतर विमान पलटले. त्यांनी सांगितले की विमानाला लगेच आग लागली आणि ते धावपट्टीच्या पूर्वेकडील दरीत कोसळले. (पीटीआय फोटो)
-
हे विमान स्थानिक विमान कंपनी सौर्य एअरलाइन्सचे होते, असे मीडियाने सांगितले. फ्लाइट रडार २४ माहीतीनुसार सौर्य विमानकंपनी नेपाळमध्ये दोन बॉम्बार्डियर CRJ-२०० (Bombardier CRJ-200) या प्रादेशिक विमानांसह देशांतर्गत उड्डाणे चालवतात, दोन्ही विमाने २० वर्षे जुनी आहेत. (पीटीआय फोटो)
-
विमान अपघातांचा एक मोठा इतिहास नेपाळमध्ये राहिला आहे. ही विमान दुर्घटनाही, नेपाळच्या विमान दुर्घटनांमधील अनेक घटनांपैकी एक ठरली आहे. देशातील आव्हानात्मक पर्वतीय भूभाग, सातत्याने बदलत राहणारे हवामान, जुनी विमाने आणि अपुरी नियामक देखरेख व्यवस्था ही अशी सर्व कारणे अशा दुर्घटना घडण्यामागे आहेत. (पीटीआय फोटो)
-
एव्हिएशन सेफ्टी डेटाबेसनुसार, नेपाळमध्ये गेल्या तीन दशकांमध्ये किमान २७ प्राणघातक विमान अपघात झाले आहेत. (पीटीआय फोटो)
-
गेल्या वर्षी जानेवारीमध्ये, पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या नेपाळच्या पोखरा शहरात लँडिंग करण्यापूर्वी यती एअरलाइन्सचे विमान क्रॅश झाल्याने पाच भारतीयांसह ७२ लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. (पीटीआय फोटो)
-
सर्वात मोठी प्राणघातक दुर्घटना १९९२ मध्ये घडली होती, जेव्हा पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सचे एअरबस हे विमान काठमांडूकडे येत असताना एका टेकडीवर कोसळले आणि १६७ लोक त्यात मृत्युमुखी पडले. (पीटीआय फोटो)
नेपाळ विमान अपघातात १८ जण ठार; कशी झाली ही दुर्घटना? स्थानिकांनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम, वाचा
स्थानिकांनी सांगितलेल्या माहितीनुसार टेक ऑफ करताना विमानाच्या पंखांचे टोक जमिनीवर आदळल्यानंतर विमान पलटले.
Web Title: Nepal plane crash kathmandu airport death number see photos spl