-
वीणा, टाळ आणि मृदंगाच्या त्रिनादासह माउली, माउली, श्री विठ्ठल, श्री विठ्ठल, ज्ञानोबा माउली, तुकारामांच्या जयघोषात भाविक, वारकऱ्यांच्या उपस्थितीत कार्तिक वद्य द्वादशीनिमित्त माउलींचा रथोत्सव साजरा झाला.
-
नरसिंह सरस्वती यांनी बनविलेल्या १५० वर्षे जुन्या सिसम लाकडी रथातून रथोत्सव सोहळा झाला.
-
रथोत्सव गोपाळपुरातून नगरप्रदक्षिणा मार्गे श्रींच्या मंदिरासमोर आला.
-
रथोत्सवात हजारो भाविकांनी जयघोष केला. भाविक भक्तिमय वातावरणात चिंब झाले.
-
वारकरी तसेच रस्त्याच्या दुतर्फा श्रींच्या दर्शनास ग्रामस्थांनी, भाविकांनी गर्दी केली होती.
-
श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्यासाठी राज्यभरातून लाखो भाविकांचा महामेळा अलंकापुरीत जमला आहे.
-
साडेतीन लाखांहून अधिक भाविक आळंदीत दाखल झाले आहेत.
-
माउलींचा ७२८ वा संजीवन समाधी दिन सोहळा गुरुवारी संपन्न होणार आहे. तर, रविवारी सोहळ्याची सांगता होणार आहे.
-
बुधवारी पहाटे खेडचे प्रांताधिकारी अनिल दौंडे यांच्या हस्ते द्वादशीची शासकीय महापूजा झाली.
-
मुक्ताई मंडपात काकडा भजन, भाविकांच्या महापूजा (श्रींच्या चलपादुकांवर), महानैवेद्य, रथोत्सव, कीर्तन, वीणा मंडप, धुपारती असे विविध कार्यक्रम झाले.
-
सायंकाळी रथोत्सव पार पडला. रथोत्सवप्रसंगी पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर, श्रींचे पुजारी अमोल गांधी, अवधूत गांधी, श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे प्रमुख विश्वस्त राजेंद्र उमाप, योगी निरंजन, डॉ. भावार्थ देखणे, संत तुकाराम महाराज देवस्थानचे विश्वस्त पुरुषोत्तम महाराज मोरे, माणिक महाराज मोरे यावेळी उपस्थित होते.
-
राज्यात सर्वदूर थंडीची सुरुवात झाली. गारठ्यापासून बचावासाठी लाखो वैष्णवांचे श्रद्धास्थान, पंढरपुरातील सावळा विठुराया आणि रखुमाईला उबदार कपडे घालण्यात आले आहेत.

Chhaava: शरद पोंक्षेंनी ‘छावा’ चित्रपट पाहिल्यावर शेअर केला व्हिडीओ; म्हणाले, “मी हात जोडून विनंती करतो…”